File photo
File photo 
विदर्भ

तूरखरेदीत बारदान्यांचा खोडा

सकाळवृत्तसेवा

अमरावती : बारदान्यांच्या समस्येने डोके वर काढल्याने शासकीय तूरखरेदीत खोडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अकरा केंद्रांवर तूरखरेदी सुरू करण्यात आल्यानंतर ही समस्या उद्‌भवली. सोलापूरहून बारदाना मागविण्यात आल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्रीमती धोपे यांनी सांगितले.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात सात, तर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने पाच असे बारा शासकीय तूरखरेदी केंद्र जानेवारी ते मार्च अशा तीन टप्प्यात प्रारंभ केले. सुरुवातीला असलेला ग्रेडरचा प्रश्‍न सुटल्यानंतर आता बारदान्यांची समस्या उद्‌भवली आहे. तूर्तास खरेदी बंद करण्याची नामुष्की फेडरेशनवर आली. खुल्या बाजारात तुरीला हमीदराच्या तुलनेत भाव चांगला मिळाल्याने शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रांकडे पाठ फिरवली. निम्म्याहून अधिक तूरखरेदी झाल्यानंतर भाव कोसळू लागल्याने शासकीय केंद्रांची मागणी वाढली. 20 मार्चपर्यंत नोंदणीची मुदत वाढवून देण्यात आली. आतापर्यंत बारा केंद्रांवर 29 हजार 412 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पैकी धारणी केंद्रावर नोंदणीच आहे. खरेदीसाठी मुहूर्त निघालेला नाही. अकरा केंद्रांवर 4088 शेतकऱ्यांनी 66 हजार 354 क्विंटल तूर विकली आहे. यातील सर्वाधिक तूर दर्यापूर केंद्रावर 1075 शेतकऱ्यांनी 15 हजार 461 क्विंटल, अचलपूर येथे 965 शेतकऱ्यांनी 12 हजार 499 क्विंटल व चांदूररेल्वे येथे 572 शेतकऱ्यांनी 8051 क्विंटल तुरीची विक्री केली आहे.
शेतकरी तूर विक्रीसाठी केंद्रावर येत असताना आता त्याला बारदाना नाही या सबबीखाली परत जाण्यास सांगण्यात येत आहे. प्रारंभी शासनाला तूरखरेदी करावी लागणार नाही, असे चित्र होते. नंतर ही स्थिती बदलली. मात्र, फार संख्येत तूरखरेदी करावी लागणार नाही, असा अंदाज होता. त्यामुळे फेडरेशनचे नियोजन चुकले. बारदान्यांची संख्या कमी पडली. आता सोलापूरहून बारदाना मागविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. खरेदी सुरूच राहणार असल्याने शेतकऱ्यांनी संदेश मिळताच शासकीय केंद्रांवर तूर आणावी, असे आवाहन फेडरेशनने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT