toor rate increases in private market of yavatmal 
विदर्भ

खासगी बाजारात तुरीला 'अच्छे दिन' , विक्रमी भावाने विक्री; लवकरच आणखी वाढणार दर

चेतन देशमुख

यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी जिल्ह्यात तुरीचे उत्पादन घटले. खरिपातील पिकालाही मोठा फटका बसला. अशातच हमीभावापेक्षा जास्त दर मिळाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीला कापूस व तुरीला खासगी बाजारात जास्त दर मिळाले नाहीत. आता खासगी बाजारात तुरीला  'अच्छे दिन' आले आहेत. हमीभावापेक्षा एक हजार दोनशे रुपये जास्त मिळत आहेत. 

केंद्र शासनाने 'अच्छे दिन'ची घोषणा केली आहे. मात्र, शेतकऱ्यांप्रतिच्या अनेक घोषणा अजूनही कागदावरच आहेत. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पावसाने सोयाबीन, कापूस व तुरीचे नुकसान झाले. परिणामी उत्पन्नात घट झाली आहे. रब्बी हंगामातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघण्याची शक्‍यता नाही. अशातच खासगी बाजारात तुरीचे दर वाढल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाने तुरीचे हमीदर सहा हजार रुपये निश्‍चित केले. त्यासाठी शासकीय हमीभाव केंद्र निश्‍चित केले होते. मात्र, सुरुवातीपासूनच खासगी बाजारात तुरीचे दर हमीभावाबरोबर होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी बाजाराला पसंती दिली. 
हमीदरापेक्षा तुरीचे दर सध्या वर चढले आहेत. मंगळवारी (ता. ९) खासगी बाजारात तुरीचे दर सात हजार दोनशे रुपयांवर पोहोचले. सध्या हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना हजार ते बाराशे रुपये जास्त मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी खर्चाच्या तुलनेत हे दरही कमी आहेत. पावसाने यंदा तुरीचे उत्पादन घटले आहे. हमीभावापेक्षा थोडी रक्कम जास्त असल्याने खासगी बाजारात तुरीची आवक वाढली आहे. तर शासकीय हमीभाव केंद्र ओस पडली आहेत. 

दरवाढीची शक्‍यता - 
अतिवृष्टीमुळे यंदा खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तुरीला मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. बाजारात तुरीची आवक कमी झाल्याने खासगी बाजारात दर वाढले आहेत. सध्या हमीभावापेक्षा तुरीला क्विंटल मागे एक हजार दोनशे रुपये जास्त मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार येत्या काही दिवसांत तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT