Police
Police 
विदर्भ

वाहन उचलेगिरीत पोलिसांची ‘चांदी’

सकाळवृत्तसेवा

नागपूर - वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे वाहन पार्क केल्यास किंवा नो पार्किंगमध्ये वाहन ठेवल्यास वाहतूक पोलिस ट्रकमध्ये वाहन टाकून उचलून नेतात. मात्र, उचललेल्या वाहनांपैकी केवळ ६० टक्‍के वाहनांवरच कारवाई केली जाते. उर्वरित वाहनांचे विनापावती पैसे घेऊन सोडून दिली जात असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांची चांदी होत आहे.

वाहतूक शाखा पोलिस दलात सात झोन आहेत. प्रत्येक झोनसाठी नो पार्किंगमधील वाहने उचलण्याचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. ठेकेदार एका ट्रकमध्ये खासगी आठ ते दहा मजूर घेऊन नो पार्किंगमधील वाहने उचलतात. ती वाहने झोन कार्यालयात जमा केली जातात. प्रत्येक ट्रक दिवसभरात जवळपास १०० दुचाकी जमा करतो. म्हणजे सात झोनमध्ये जवळपास ७०० दुचाकी उचलून आणल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात केवळ ६० टक्‍केच वाहनांवर कारवाई करून पावती फाडली जाते, अशी चर्चा पोलिसांत आहे. झोन कार्यालयात दंड भरून दुचाकी परत घेण्यासाठी येणाऱ्या वाहनमालकाला वाहनांची कागदपत्रे मागितली जातात. त्यानंतर दंड भरण्याऐवजी त्याला ‘दुसरा मार्ग’ सांगितला जातो.

वाहतूक बेताल
शहरातील वाहतूक व्यवस्था पुरती बिघडली आहे. मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी जाम लागतात. त्यातही बरेच वाहतूक पोलिस कर्मचारी ऑटोचालक आणि अन्य वाहनांकडून ‘वसुली’ करण्यात व्यस्त असतात. शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले उपायुक्‍त गजानन राजमाने यांनी अशा कर्मचाऱ्यांच्या हालचालींकडे लक्ष दिल्यास वाहतूक व्यवस्था पुन्हा ताळ्यावर येऊ शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT