विदर्भ

यवतमाळातील दोन सायकलस्वारांचा मनाली-लेह लदाख सायकलने प्रवास!

शशिकांत जामगडे

पुसद (जि. यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक असलेल्या दोन अनुभवी सायकलस्वारांनी हिमाचल प्रदेशमधील व जगातील सर्वांत उंच असलेल्या मनाली ते लेह व लेह ते खरदुंगला टॉप असा ५२५ किलोमीटरचा सायकल प्रवास सोमवारपासून (ता. ३०) सुरू केला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालयातील सुपरिचित असलेले शारीरिक शिक्षक अनंत जाधव व दिग्रस पंचायत समितीतील चिंचोली क्रं. २ येथील जि. प. शिक्षक नितीन डहाके यांनी हिमाचल प्रदेशमधील व जगातील सर्वांत उंच असलेल्या मनाली ते लेह व लेह ते खरदुंगला टॉप असा ५२५ किलोमीटरचा सायकलने प्रवास करण्याचे ठरविले.

वर्धा सेवाग्राम येथून शनिवारी कुलू मनालीसाठी रेल्वेने प्रस्थान केले. सोमवारी पोहोचल्यानंतर त्यांनी सायकल प्रवासाला सुरुवात केली. जवळपास आठ ते दहा दिवसांत अतिशय खडतर असलेला ५२५ किमीचा प्रवास करून अमृत महोत्सवी वर्षाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन करणार आहेत. दोघेही अनुभवी सायकलस्वार आहेत. यापूर्वीही त्यांनी खडतर असा सायकलचा प्रवास पार पाडला आहे.

अनंत जाधव यांनी यापूर्वी कोकण ट्रॅक्टर गुहागर ते गोवा ३७० किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. तसेच बर्गामाऊंट या इवेंटमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर १०० दिवसांत १,२८० किलोमीटर अंतर पूर्ण केले. अनंत जाधव यांनी आजपर्यंत एकूण सव्वीस हजार किलोमीटर सायकलिंग केले आहे. अनंत जाधव व नितीन डहाके यांच्या या प्रवासासाठी प्रा. डाॅ. शरद ठाकरे, प्रा. अजय राठोड व गुणवंतराव देशमुख विद्यालयातील शारीरिक शिक्षक अविनाश कराळे व मित्र मंडळाळाने शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT