Mokhada News  sakal
विदर्भ

Mokhada News : गावाच्या सुखशांती साठी भोडवाई कडुन देवीचा जागर; आदिवासींची शेकडो वर्षांची परंपरा..

Mokhada News: गावात सुखशांती रहावी, रोगराई दुर व्हावी,धनधान्याची भरभराट व्हावी म्हणून नवरात्रौत्सवात आदिवासी महीलांकडुन, भोंडवाईच्या परंपरेतुन देवीचा आणि ग्रामदेवतेचा जागर केला जातो आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mokhada News: गावात सुखशांती रहावी, रोगराई दुर व्हावी, सर्वाना ऊत्तम आरोग्य लाभावे आणि पीक, पाणी चांगले येऊन, घराघरात धनधान्याची भरभराट व्हावी म्हणून नवरात्रौत्सवात आदिवासी महीलांकडुन, भोंडवाईच्या परंपरेतुन देवीचा आणि ग्रामदेवतेचा जागर केला जातो आहे.

आदिवासी समाजात वेगवेगळ्या रूढी परंपरा आहे. आदिवासी निसर्गालाच आपला देव मानतात. यामध्ये प्रामुख्याने ग्रामदैवतेचाही समावेश आहे. आपले सणं, ऊत्सव हे आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरे केले जातात.

त्यासाठी वेगवेगळ्या प्रथा, गाणी आणि नाचाची वेगवेगळी ठेवणं आहे. नवरात्रौत्सवात भोंडवाई ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या प्रथेतुन निसर्ग देवता, ग्राम देवता आणि देवीचा जागर आपल्या बोली भाषेतील गाण्यांमधुन केला जातो. महीलांकडुन ही परंपरा आजही जपली जाते आहे.

नवरात्रौत्सवात भोंडवाई परंपरेत खुरासणी चे फुले आणि नवीन आलेल्या धान्यांची लोंबे एका तांब्यात ठेऊन कलश केला जातो. बाजारपेठील दुकानांत तसेच गावागावात घरोघरी जाऊन, आदिवासी महिला लाकडी टिपर्या वाजवुन, आपल्या बोली भाषेतुन देवीची, ग्रामदेवतेची गाणे गाऊन जागर करतात. गावात सुखशांती नांदावी, रोगराई दुर व्हावी आणि पीक पाणी भरभरून यावे, यासाठी भोंडवाई ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. 

हा जागर करत असताना, महिलांना धान्य, वस्तु आणि पैशाच्या रूपाने जोगवा दिला जातो. रात्री गावातील ग्रामदेवतेची आणि निसर्ग देवतेची पुजा केली जाते. मिळालेल्या जोगव्यातुन खिर अथवा गोड पदार्थाचा प्रसाद बनवला जातो. त्याचा आस्वाद संपुर्ण गावातील अबालवृद्ध घेतात.

त्यानंतर गावातील एका मध्यवर्ती ठिकाणी एकत्र येत, मधोमध कलश ठेऊन, आदिवासी महिला त्याच्या भोवती फेर धरून, आपला पारंपारिक नाच आणि गाणे गाऊन देवीचा आणि ग्रामदेवतेचा जागर करतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आजही, पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात सुरू आहे. 

गावात सुखशांती लाभावी, माणसं, जनावरांवर रोगराई येऊ नये, पीक पाणी चांगले यावे म्हणून नवरात्रौत्सवात भोंडवाई ही आमची परंपरा आहे. कित्येक वर्षाची ही परंपरा आम्ही जतन करत आलोय, नव्या पिढीला ही कळावी म्हणून आम्ही वयोवृद्ध महिला यामध्ये सहभागी होत आहेत. मिळालेल्या जोगव्यातुन आम्ही गावातील ग्रामदेवतेच्या अथवा हनुमान मंदिरात खिर अथवा गोडधोड करून सर्व गावाला प्रसाद खाऊ घालतो.

मिरा सक्रु शिद,वयोवृद्ध भोंडवाई, कोचाळे,मोखाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT