भंडारा : स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करताना पोलिस अधीक्षक साळवे.
भंडारा : स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करताना पोलिस अधीक्षक साळवे.  
विदर्भ

हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलिसांना श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : कर्तव्य बजावताना असताना हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलिस जवानांना सोमवारी पोलिस हुतात्मा स्मृतीदिनी मुख्यालयातील स्मृतीस्तंभ स्मारक परिसरात पोलिस विभागातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी रीना जनबंधू, पोलिस उपअधीक्षक (गृह) बी. आर. गाडे उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधीक्षक श्री. साळवे म्हणाले, आजचा दिवस पोलिस प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतातून एकूण 414 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना मातृभूमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली आहे. भारत तिबेट सीमेवर आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दहा सैनिकांनी प्राणपणाने लढून हौतात्म्य पत्करले. त्यामुळे हा दिवस पोलिस हुतात्मादिन म्हणून पाळला जातो, असे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक साळवे व अपर पोलिस अनिकेत भारती यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. अग्निशस्त्राद्वारे 30 काडतुसांच्या फैरी हवेत झाडून सलामी देण्यात आली.
जिल्ह्यातील शहीद झालेल्या दीपक रहिले, योगेश्‍वर हेडाऊ, शिवलाल बरैया, दामोधर वडतकर, रवीकुमार जौंजाळ, ईशांतकुमार भुरे, भोजराज बाभरे, मूलचंद भोयर, मनोज गिऱ्हेपुंजे, बी. डी. बांते, पोलिस उपनिरीक्षक चौधरी, हवालदार बोरकर, पठाण, शेळके यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी व शहीदांचे कुटुंबीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. पोलिस बॅण्ड पथकाने देशभक्तिपर गीतांचे वादन करून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक मानकर, श्री. तेलुरे, श्री. थोरात, सहायक पोलिस निरीक्षक क्रिष्णा हत्तीमारे, उपनिरीक्षक पवनसिंग सर्व शाखेतील पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT