crime
crime 
विदर्भ

गोमांस वाहून नेणारा ट्रक अडकला पोलिसांच्या जाळ्यात 

संतोष ताकपिरे

अमरावती ः शहरात गोवंशाची अवैध वाहतूक करणे आणि कत्तलीला शासनाची मनाई असतानाही अवैध कत्तलखाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. एका ट्रकमधून लाखो रुपयांचे बारा टन गोमांस पोलिसांनी जप्त केले. 

मोहंमद अर्शद मो. मजीद (वय २४), जुबेरखॉं तमीजखॉं (वय २६, दोघेही रा. अकबरनगर) यांच्यासह मकसूद हमद शेख जमीर (वय ४१, रा. रतनगंज, गवळीपुरा) अशा तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. गवळीपुरा अमरावती सोलायटर लॉन रिंगरोड मार्गाने एमएच ०४ ईएल ९०५८ क्रमांकाच्या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात जनावरांचे मांस दिसले. १२ टन मांस हे अंदाजे १८ लाख रुपयांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या व्यतिरिक्त चार लाखांचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला. 

ट्रकमालक अ. नाजीम अ. हमीद (वय 30, रा. नमुनागल्ली) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता बारा टन गोमांस हे इर्शाद कुरेशी यांच्या मालकीचे असल्याचे त्याने सांगितले. नागपुरीगेट ठाण्यात नमूद लोकांविरुद्ध नांदगावपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

शहरातून अनेक दिवसांपासून जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. महिनाभरापूर्वी लालखडी भागातून तीन मोठ्या गोदामातून शेकडो जनावरे ज्यात गाय, बैल आणि कालवडींचा समावेश होता, ती जप्त केली होती. शहरातून मुंबईसह बाहेर राज्यात मोठ्या प्रमाणात मांस वाहतूक केले जाते. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. 

तिवश्‍यात १६ जनावरे सापडली 

तिवसा ते मोझरी मार्गावरील एका ढाब्याजवळ एमएच ३४ एव्ही ०९६२ व एमएच ३२ क्‍यू ४७८५, अशा दोन मालवाहू वाहनांतून १६ बैलांची अवैध वाहतूक सुरू असताना ही वाहने ढाब्याजवळ पकडण्यात आली. जनावरांची रवानगी गोरक्षणमध्ये केली. तिवसा पोलिसांनी वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT