Accident esakal
विदर्भ

Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू, एक जखमी

राष्ट्रीय महामार्गावर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी रात्री भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.

सकाळ वृत्तसेवा

भंडारा - येथे राष्ट्रीय महामार्गावर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी रात्री भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाला आहे. मृताचे नाव सोपान नामदेव टांगले (वय. ५८, या.सालेबर्डी) असे आहे.

तालुक्यातील सालेबर्डी येथील सोपान टांगले हा रात्री १० वाजताच्या सुमारास दुचाकीने विशाल टांगले यांच्या सोबत गावाकडे जाण्यास निघाला. राष्ट्रीय महामार्गावर तहसील कार्यालयासमोर भरधाव वेगाने आलेला ट्रक (सीजी ०४/एचवाय ७२९६)चालकाने सोपान यांच्या दुचाकीला डाव्या बाजूला कट मारला. यामुळे दुचाकीसह महामार्गावर पडलेला सोपान गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

तसेच सोबत असलेला विशाल टांगले हा किरकोळ जखमी झाला आहे. भंडारा पोलिसांनी ट्रक चालक हर्षदीप सिंग मलडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT