संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

आम्ही येथील दादा, काढ पैसे...

संतोष तापकिरे

अमरावती : ग्रामीण भागात कवठाळ ते राजूरवाडी मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचालकास आम्ही दादा आहोत. सर्व आम्हाला भितात, असे म्हणून जे जवळ असेल ते काढ, अशी धमकी दिली. ट्रकचालकाने नकार देताच हल्ला करून त्यांनी हजारोंचा ऐवज लुटला.


परवेश खान वल्द सामूर खान (वय 30, रा. पच्चटी, बिहार), असे लुटारुंच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. तो यवतमाळच्या एका मालवाहू कंपनीच्या वाहनावर चालक आहे. एमएच 40 वाय 8651 क्रमांकाचा ट्रकमध्ये सिमेटची पोती घेऊन तो 23 जुलै रोजी निघाला. मोर्शी ते राजूरवाडी मार्गावर त्याचे वाहन नादुरुस्त झाले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून परवेश खान हा ट्रकच्या आत झोपला. कवठाळ ते राजूरवाडी मार्गावर 24 जुलैला रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आवाज देऊन उठविले.

दस्तऐवज तपासणीसाठी मागितले व ट्रकच्या खाली उतरविले. पैसे काढून दे, अन्यथा मारण्याची धमकी त्या लुटारुंनी दिली. त्या दोघांनी स्वत:ला आम्ही या परिसराचे दादा आहोत, लोक आम्हाला भितात, असे म्हणून नरेंद्र आठवले (रा. कवठाळ) व मिलन कोठे (रा. नांदुरा पिंगळाई), अशी ओळखी ट्रकचालकास करून दिली. त्यानंतर मारहाण करून तीन हजारांची रोकड जबरीने लुटून दुचाकीवरून पळ काढला. ट्रकचालक परवेश खान यांनी ट्रकमालकास घटनेची माहिती दिली, त्यानंतर शिरखेड पोलिस ठाण्यात लुटमारप्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयित आरोपी आठवले व कोठेविरुद्ध लुटमार, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

न्यायालयाने गुन्हा दाखल झालेल्या दोघांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. लुटलेला ऐवज, गुन्ह्यातील दुचाकी जप्त झाली.
केशव ठाकरे, पोलिस निरीक्षक, शिरखेड.  

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT