Turdal 
विदर्भ

तुरीची डाळ गाठणार शतक

राजेश रामपूरकर

नागपूर - निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा तुरीचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्‍क्‍यांनी घटले आहे. त्यामुळे होळीनंतर किरकोळ बाजारात तूर डाळ प्रतिकिलो १०० रुपयांवर पोहोचण्याची शक्‍यता आहे. दुष्काळाची झळ यंदा स्वादिष्ट जेवण्यावरसुद्धा पडण्याचे संकेत आहेत. सध्या तूरडाळ प्रतिकिलो ८५ ते ८७ रुपये किलोवर पोचली आहे. 

तूरडाळ पाठोपाठ उदीड, मूग डाळीच्या किमतीत वाढण्याची शक्‍यता आहे. तूरडाळीचे यंदा २२ लाख टन उत्पादन झाले असून गतवर्षी ४०लाख टन उत्पादन झाले होते. अल्प उत्पादनामुळे यंदा डाळीचे भाव वधारण्याचे संकेत मिळू लागले आहे. सध्या किरकोळ बाजारात तूरडाळीचे भाव प्रतिकिलो ८५ ते ८७  रुपये आहेत. नवीन तूरडाळीची आवक सुरू झालेली आहे.

अद्याप हवी तशी आवक सुरू झालेली नसली तरी उत्पादन कमी आणि मागणी लक्षात घेता भाववाढ अपेक्षित आहे. तूरडाळ हे दैनंदिन धान्यातील अत्यंत महत्त्वाचे धान्य मानले जाते. मात्र, घाऊक बाजारात भावात वाढ होऊ लागल्याने डाळीचे भाव वाढू लागले आहेत, असे किराणा व्यावसायिक प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.  

एक महिन्यातच क्विंटलमागे सातशे रुपयांची वाढ होऊन घाऊकमध्ये दर्जानुसार भाव प्रतिकिलो ८० ते ८२ रुपयांवर पोहोचले आहेत. पुढेही भाववाढीची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गेल्यावर्षी भाव न मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाकडे दुर्लक्ष करून कापूस पिकावर लक्ष केंद्रित केले. याशिवाय कमी पावसामुळे यावर्षी तुरीचे पीक कमी येण्याचा कृषितज्ज्ञांचा अंदाज आहे. यामुळेच व्यापाऱ्यांनी ग्राहकांना फेब्रुवारी महिन्यातच तूरडाळ खरेदी करून घ्यावी असे आवाहन केले आहे. होळीनंतर तूरडाळीचे भाव १०० रुपयांचा आकडा पार करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

तीन वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव प्रतिकिलो १८० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढलेल्या भावामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. भाव सामान्यांच्या आवाक्‍यात यावेत, यासाठी सरकारने प्रयत्न केले होते. आयातही सुरू केली होती. मात्र, तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे गतवर्षी तूरडाळ ६५ रुपये किलोपर्यंत घसरली होती.

भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून फारशी मागणी नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तूरडाळीचा साठा केलाच नाही. पण, यावर्षी पीक कमी येण्याच्या अंदाजामुळे व्यापाऱ्यांनी सावधतेने पावले उचललेली आहेत. गेल्यावर्षी तुरीला भाव कमी मिळाल्यामुळे केंद्र सरकारने आधारभूत किंमत ५६७५ रुपये आहे. पीक कमी येण्याचा अंदाज खरा ठरल्यास भाव झपाट्याने वाढतील.
- प्रताप मोटवानी, सचिव, होलसेल ग्रेन मर्चंटस असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

‘कसाब बिर्याणी मागतोय’ हा ‘माझाच फंडा’! खासदार ॲड. उज्ज्वल निकम; प्रकट मुलाखतीत उलगडले अनेक किस्से..

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT