नागपूर : "सकाळ'ने रविवारी, 26 मे रोजी ठळकपणे प्रकाशित केलेले शहरातील ट्युशन क्‍लासेसचे वास्तव.
नागपूर : "सकाळ'ने रविवारी, 26 मे रोजी ठळकपणे प्रकाशित केलेले शहरातील ट्युशन क्‍लासेसचे वास्तव.  
विदर्भ

खासगी ट्युशन क्‍लासेसची होणार तपासणी

सकाळवृत्तसेवा

नागपूर : अग्निशमन यंत्रणेचा वापर न करता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या शहरातील सर्व ट्युशन क्‍लासेसची महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी निर्देश देताच प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी आठही अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांना ट्युशन क्‍लासेसच्या तपासणीचे निर्देश दिले.
"सकाळ'ने रविवारी, 26 मे रोजी "विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ' या मथळ्यासह ठळकपणे वृत्त प्रकाशित करीत शहरातील ट्युशन क्‍लासेसमधील चित्र चव्हाट्यावर आणले होते. ट्युशन क्‍लासेस सुरू असलेल्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव असून सुरत येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती "सकाळ'ने वर्तविली. या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी आठही अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. शहरात व्यापारी संकुल तसेच निवासी इमारतीत सुरू असलेल्या सर्व लहान मोठ्या खासगी ट्युशन क्‍लासेसची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी अग्निशमन अधिकाऱ्यांना दिले. शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुलात अवैधरित्या ट्युशन क्‍लासेस सुरू आहेत. निवासी इमारतीतही ट्युशन क्‍लासेस सुरू असून येथे फार कमी जागेत विद्यार्थी कोंबले जात आहे. या ठिकाणी कुठलीही अग्निशमन यंत्रणा नसल्याचे उचके यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. अशा ट्युशन क्‍लासेसविरुद्ध अग्निशमन विभागाने लक्ष केंद्रित केल्याचे नमुद करीत उचके यांनी सर्व झोनचे अधिकारी, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांपुढे अवैध ट्युशन क्‍लासेसची स्थिती मांडणार असल्याचे सांगितले. याशिवाय अशा अवैध ट्युशन क्‍लासेसचा पाणी व वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी महावितरण, एसएनडीएल, महापालिकेचा जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्लूला सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु अग्निशमन विभागाला संबंधित विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचेही चित्र आहे.
सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेधले लक्ष
दरम्यान, आज शिवसेनेचे हितेश यादव व नितीन तिवारी यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन अग्निशमन यंत्रणेशिवाय सुरू असलेल्या ट्युशन क्‍लासेस संचालकांविरुद्ध कारवाईची मागणी केली. अनेक इमारतींकडे आक्‍युपंसी सर्टिफिकेट नाही, याकडेही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. आयुक्त अभिजित बांगर यांनी तत्काळ प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना अग्निशमन यंत्रणा नसलेल्या ट्युशन क्‍लासेसची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT