A twelve-year-old girl's own abduction drama
A twelve-year-old girl's own abduction drama 
विदर्भ

आई-वडिलांच्या कटकटीपासून वाचण्यासाठी मुलीने रचला हा प्लान 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील एका बारा वर्षीय मुलीने स्वतःच्या अपहरणाचे कुंभाड रचले. भरवस्तीत भरदिवसा घडलेल्या या अपहरणाच्या कथित घटनेने हादरलेल्या पोलिस यंत्रणेचा मुलगी ताब्यात मिळाल्यानंतर जीव भांड्यात पडला. 

झालेल्या प्रकाराबाबत मुलीचे सांगितले की, टीव्ही पाहत असताना घरात शिरलेल्या व्यक्‍तींनी जबरीने उचलून व्हॅनमध्ये कोंबले. दुपारी 12 वाजता पळविले. व्हॅनमधून कशीबशी सुटका करून धानोरा गुरव येथे पोहोचले. मारोती व्हॅनमध्ये आणखी चार-पाच मुलींचे हातपाय बांधून पोत्यात डांबलेले आहे, अशी माहिती संबंधित मुलीने यवतमाळ मार्गावरील धानोरा गुरवनजीकच्या शिरपूर येथून पित्याला दुपारी 4.30 वाजता फोनद्वारे दिली. 

हा धक्कादायक प्रकार ऐकून पित्याने या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना तर घटनास्थळावरील नागरिकांनी नांदगावखंडेश्‍वर पोलिसांना दिली. राजापेठ पोलिसांनी संबंधित पित्याचे नाव नोंदवून घेतले. राजापेठ पोलिसांनी या घटनेची माहिती 4.40 च्या सुमारास बिनतारी संदेश यंत्रणेवरून नियंत्रण कक्षाला तर नियंत्रण कक्षाने राजापेठ, बडनेरा, फ्रेजरपुरा पोलिसांना देऊन व्हॅन कदाचित अमरावतीकडे परत निघाली असेल ही शक्‍यता लक्षात घेता प्रत्येक मारोती व्हॅन तपासणीची सूचना केली. 

राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी कर्मचाऱ्यांना त्या मुलीच्या घरी पाठविले असता संबंधित मुलीने स्वतःच घराला कुलूप लावून चावी आपल्याकडे दिल्याचे व मामाकडे जात असल्याचे शेजारी महिलेस सांगितल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आई-वडिलांकडून धाकदपट केली जात असल्याने मुलीने स्वतःच्याच अपहरणाचे कुभांड रचल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT