Twenty Five tan dal burn in truck accident  
विदर्भ

दुष्काळात तेरावा महिना, ट्रकला लागलेल्या आगीत तूरडाळ जळून खाक

सकाळ वृत्तसेवा

वनोजाबाग (जि. अमरावती) : क्षमतेपेक्षा अधिक माल भरून ट्रक चालवल्यामुळे ट्रकचे होणारे अपघात हा नेहमीचाच प्रश्‍न आहे. अनेकदा ट्रकमध्ये खूप जास्त माल भरला जातो आणि वळणावर ट्रक वळवताना ट्रक चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटते आणि गंभीर अपघात होतात. असाच भीषण अपघात नुकताच झाला आणि ट्रकमधील माल त्या अपघातात जळून खाक झाला.
कोरोनाच्या संकटाने देशाचेच काय जगाचेही कंबरडे मोडले आहे. सगळी आर्थिक गणिते विस्कटली आहेत, त्यातच एका अपघातात तुर डाळ जळून खाक झाली आणि आणखी नुकसान झाले.

अकोला येथून लकिमपूर (मध्य प्रदेश) येथे 25 टन तुरीची डाळ घेऊन जाणारा ट्रक अंजनगाव ते आकोट रोडवरील सातेगाव फाट्यानजीक पलटी झाला. या ट्रकला लागलेल्या आगीत तूरडाळ पूर्णपणे खाक झाल्याने ट्रकसह तूरडाळीचे अंदाजे 35 ते 40 लाखांचे नुकसान झाले.

अकोला येथून 25 टन तूरडाळ घेऊन जाणाऱ्या ट्रकचे (क्रमांक ः एचएम 09- पी 8693) स्टेअरिंग लॉक झाल्याने तो सातेगाव फाट्यानजीक पलटी झाला. ही घटना शनिवारी (ता. 2) रात्री घडली. तूरडाळीने भरलेला ट्रक रात्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या इलेक्‍ट्रिक खांबावर धडकला. त्यामुळे इलेक्‍ट्रिक खांबावरील तारांचे स्पार्किंग झाल्याने आगीचे गोळे ट्रकवर पडल्याने आग लागली आणि ट्रकमधील तूरडाळीचे पोते व ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने ट्रकचालक व क्‍लिनरने ट्रकमधून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले. या अपघातात 20 लाख रुपयांची डाळ व ट्रकचे नुकसान धरून जवळपास 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले. पुढील तपास अंजनगावसुर्जीचे पोलिस निरीक्षक जावरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT