two arrested in superstition case in wardha
two arrested in superstition case in wardha 
विदर्भ

पैशाचा पाऊस पाडण्यावरून युवतीशी अघोरी कृत्य, आणखी दोघे ताब्यात; मुख्य आरोपी फरारच

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : पैशासाठी माणूस कोणत्याही थराला जातो, तर आपल्या पोटच्या मुलीला सोबत नेत भोंदू बाबाच्या मदतीने पैशाचा पाऊस पाडण्याचा अघोरी प्रकार वर्ध्यात उघडकीस आला. या प्रकरणात आज, गुरुवारी पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दीपक आणि पंकज अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींना उद्या, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करीत दोघांना अटक केली होती. गुरुवारी (ता. आठ) आणखी दोघांना दोघांना ताब्यात घेतले आहे. 

दिलेल्या तक्रारीत, पीडित मुलगी गत काही दिवसांपासून शिक्षणासाठी वर्ध्यात राहत होती. चार वर्षांपासून ती आईवडिलांसह किरायाच्या घरात राहत होती. तिची आई हॉटेलमध्ये काम करीत होती. त्यावेळी तिच्या आईची ओळख संगीता नामक बाईशी झाली. नोव्हेंबर २०१९ मध्ये संगीता नावाच्या बाईने तिच्या आईला तुझ्या मुलीचा गुप्तधन काढण्यासाठी व पैशाचा पाऊस पाडण्यासाठी उपयोग होऊ शकतो. याकरिता चंद्रपूर येथील डीआरसोबत आपण भेटू. तो मंत्राने पैशाचा पाऊस पाडेल, गुप्त धन शोधून देईल, असे सांगितले. त्या बाईच्या सांगण्यावरून मुलीला तिची आई जबरदस्तीने चंद्रपूर येथे घेऊन गेली. तेथील बसस्थानकावर डीआरला फोन करते म्हणून कोणाला तरी फोन लावला, परंतु डीआर न आल्याने चंद्रपूर येथे मुक्‍काम केला. 

यानंतर मुलीला जबरदस्तीने नांदगाव येथील शेतातील गोठ्यात घेऊन गेले. या प्रकाराला कंटाळून मुलीने पळ काढला. पोलिसांनी या मुलीचा शोध घेतल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. यावरून पोलिसांनी अंधश्रद्धा प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून मुलीच्या काकासह प्रवीण नामक व्यक्तीला अटक केली होती. या प्रकरणात गुरुवारी (ता. आठ) दीपक आणि पंकज नामक युवकाला ताब्यात घेतले आहे. त्यांना शुक्रवारी (ता. नऊ) न्यायालयासमोर हजर करणार आहे. या प्रकरणात आणखी दोन ते तीन आरोपी असण्याची शक्‍यता आहे. यातील मुख्य आरोपी असलेला भोंदू बाबा अद्यापही फरारच आहे. रामनगर पोलिस त्याचा शोध घेत आहे. 

अ. भा. अंनिस, सर्व सामाजिक संघटना तक्रारकर्त्या मुलीच्या मागे उभ्या आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यातील आरोपींचे तार राज्यातील अनेक जिल्ह्यांतील मांत्रिकांशी जुळलेले असल्याचे समोर येईल. पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाने अनेक मुलींचे, महिलांचे शोषण, छळ होत आहे. यात कुटुंबीय, नातेवाईक, संपर्कातील व्यक्तीच सहभागी आहेत. अशा युवती, महिलांनी किंवा यांच्या संपर्कातील नागरिकांनी पोलिसांना, अ. भा. अंनिसला याची माहिती द्यावी. 
- पंकज वंजारे, महाराष्ट्र राज्य संघटक अ. भा. अंनिस-युवा शाखा. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT