file photo 
विदर्भ

दुर्दैव! शेततळ्यात अंघोळ करणे मुलांना भोवले, दोघांचा बुडून मृत्यू

संतोष ताकपिरे

अमरावती : अंघोळीकरिता गेलेल्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी (ता. २६) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सकाळी नऊपासून हे दोघे घरून गेले होते. तन्मय मारोती भुरे (वय ९) व आर्यन दिलीप टेटू (वय ८, दोघेही रा. अंजनगावबारी) अशी मृत मुलांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी सांगितले.

तन्मय व आर्यन हे दोघेही घरी आईवडिलांना न सांगता अंघोळ करण्यासाठी सकाळीच नऊच्या सुमारास गावालगतच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या शेततळ्यात गेले. दोघांनाही पोहता येत नव्हते. परंतु पाण्यात जाण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. शिवाय घटनेच्या वेळी त्याठिकाणी दोघांव्यक्तीरिक्त त्यांना टोकणारे कुणीच नव्हते.

तलावाच्या काठावर कपडे

तलावाच्या काठावर कपडे काढल्यावर ते दोघेही पाण्यात उतरले. पावसाळ्यामुळे शेततळ्यात बऱ्यापैकी पाणी साचलेले आहे. दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे एकापाठोपाठ दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ते दोघेही इयत्ता तिसरीमध्ये शिकत होते, असेही पोलिसांनी सांगितले.

पालकांची शोधमोहीम

सायंकाळपर्यंत मुले घरी परत आले नाही. त्यामुळे तन्मय व आर्यन यांच्या पालकांनी शोधमोहीम सुरू केली. शेततळ्याजवळ काही जण पोहोचले तेव्हा दोघांचे कपडे काठावर आढळल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचे समजले. बडनेरा पोलिसांना सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आर्यन व तन्मय या दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. बडनेरा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.

दोन दिवसात दुसरी घटना

अंजनगावसुर्जी तालुक्‍यात खोडगाव येथे शुक्रवारी (ता. २५) दोन चुलत भावांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी अंजनगावबारीत दोघे चिमुकले दगावल्याची घटना घडली.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT