baglinga village sakal
विदर्भ

Amravati News : बालमृत्यूने हादरले बागलिंगा गाव! बहीण-भावाचा मृत्यू

चिखलदरा तालुक्यातील बागलिंगा येथे एकाच घरातील सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

सकाळ वृत्तसेवा

जामली (जि. अमरावती) - चिखलदरा तालुक्यातील बागलिंगा येथे एकाच घरातील सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिवसभर खेळल्यानंतर संध्याकाळी सात वाजता दोन्ही मुलांनी घरातील पाणी प्यायल्याने भोवळ आली व मृत्यू झाला, असे घरातील आई-वडिलांचे म्हणणे आहे.

टेम्ब्रुसोंडा आरोग्यकेंद्रांतर्गत येत असलेल्या बागलिंगा गावातील रुद्राक्ष राजेश मावस्कर (वय अडीच वर्ष) व गायत्री राजेश मावस्कर (वय ५ वर्षे) असे मृत्यू झालेल्या बालकांची नावे आहेत. राजेश मावस्कर हे उन्हाळ्यात मुंबई येथे मुलाबाळांसह कामावर होते. सोमवारी (ता. तीन) संध्याकाळपर्यंत घरी बागलिंगा येथे पोहोचले. दिवसभर दोन्ही मुले घरात व अंगणात खेळत होती.

संध्याकाळी आई-वडिलांनी आवाज दिल्यावर ती दोन्ही मुले घरात आली. दोघेही पाणी पिलेत. अर्ध्या तासानंतर दोघांना भोवळ आली. जमिनीवर पडले असता मुलांचे डोळे पांढरे झाले. काही कुणाला सांगण्याच्या अगोदरच दोन्ही मुलांनी क्षणार्धातच आपले डोळे मिटले, असे घरच्यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची बागलिंगा गावाला भेट

दोन्ही बालकांच्या मृत्यूची बातमी समजताच त्या घराला भेट दिली. घरच्यांनी सांगितले की, दोन्ही मुले धरणाच्या पाण्यात अंघोळीला गेली होती. त्यावेळी त्यांना साप चावला किंवा उन्ह लागल्याचा अंदाज आहे. त्या मुलांचे आईवडील खरे बोलण्यास तयार नाहीत. त्यांनी मुलांना पण पाहू दिले नाही, असे टेम्ब्रुसोंडा येथील वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंदन पिंपळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT