File photo
File photo 
विदर्भ

स्क्रब टायफसने दोघांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

गोंदिया : स्क्रब टायफसने जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यातील विनोद साधू राऊत (वय 45) हा नवेगावबांध येथील माहुली मोहल्ल्यातील तर, सुनील ओमप्रकाश लोथे (वय 19) सडक अर्जुनी तालुक्‍यातील राका येथे राहणारा आहे.
प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, येथील ग्रामीण रुग्णालयात 17 सप्टेंबरपासून विनोद राऊत उपचार घेत होते. स्क्रब टायफसचा रुग्ण असल्याचा संशय डॉक्‍टरांना आल्याने त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. परंतु, त्यांना कुटुंबीयांनी गोंदिया येथे न नेता सानगडी येथील एका भोंदूबाबाकडे नेले. आज, बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. विनोद 10-12 दिवसांपासून ताप व डोके दुखीने आजारी होते. त्यांनी खासगी डॉक्‍टरांकडे उपचार घेतला. परंतु, आजार बरा झाला नाही.
सुनील लोथे या तरुणाची दोन दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. त्याला गावातील खासगी रुग्णालय तसेच सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, हगवण आणि उलटीचा त्रास कमी न झाल्याने त्याला आज, बुधवारी सकाळी गोंडउमरी येथील खासगी रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. स्क्रब टायफसने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT