file photo
file photo 
विदर्भ

कोळसा खाणीत गुदमरून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत गुरुवारी (ता. 18) सायंकाळी दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये वेकोलि कर्मचारी गुड्डू रामेश्‍वर सिंह व त्यांचा भाचा राजकुमार महेंद्र सिंह यांचा समावेश आहे. या घटनेत दोन कर्मचारी गंभीर झाले आहेत.
वणी उत्तर क्षेत्रात "वेकोलि'च्या 13 कोळसा खाणी आहेत. त्यातील कुंभारखणी व भांदेवाडा येथे भूमिगत कोळसा खाणी आहेत. कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण गेल्या 2000 मध्ये सुरू करण्यात आली. त्यातील कोळसा संपल्याने "वेकोलि'च्या प्रशासनाने मागील वर्षीपासून ही खाण बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदर खाण बंद करण्याचे काम सुरू आहे. सुटीवर असलेले गुड्डू सिंह गुरुवारी कामावर परतले. यावेळी सोबत असलेला भाचा राजकुमारने आग्रह केल्याने दोघेही खाणीच्या आत गेले. दरम्यान, अचानक गॅस लीक झाल्याने दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला. कुंभारखणी "वेकोलि' वसाहतीत राहणारे कर्मचारी बंडू ठेंगणे (वय 55) व महादेव तेलंग (वय 59) हे दोघेही खाण बंद करण्याचे काम करीत असल्याने गॅस लीकची झळ त्यांनाही पोहोचली. त्यांना लगेच उपचारासाठी वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनास्थळी पोलिस पथक रवाना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC : कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT