two died in bus and two wheeler accident in parshiwani of nagpur 
विदर्भ

खासगी बसची दुचाकीला धडक, दोन मुलं जागीच ठार

विजयकुमार राऊत

पारशिवनी (जि. नागपूर) : भरधाव ट्रॅव्हलने दुचाकीस धडक दिली. या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठाप झाले. यश भालेराव (वय१३ ), अनुप अतुल पनवेलकर( वय१४), असे मृतांची नावे आहेत, तर लकी चव्हाण हा जखमी असून बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.  

यश हा अनुप व लकी या मित्रांसोबत दुचाकीने खापरखेडाकडून पारशिवनीकडे येत होता. अशातच  आमडी फाट्याकडून सावनेरकडे जाणाऱ्या खासगी बसने दुचाकीस जोरात धडक दिली. यात यश भालेराव व अनुप पनवेलकर या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. लकी चव्हाण हा जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. खासगी बसचालकाने आपली गाडी खापा येथील पोलिस ठाण्यात जमा केली. खासगी बसचालक प्रकाश डहारे (४५, राहणार मूलताई) याला अटक करण्यात आली. या अपघातामुळे गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून चौकात  'रास्तारोको' आंदोलन करण्यात आले. 

नागरिकांची मागणी -
छत्रपती शिवाजी महाराज चौकासोबतच साई ले आऊट चौक, बँक ऑफ इंडिया चौक, शासकीय रुग्णालय, तहसील कार्यालय चौक, महात्मा गांधी चौक या ठिकाणी तत्काळ गतिरोधक लावण्यात यावे, दिवाणी व फौजदारी न्यायालय ते महात्मा गांधी महाविद्यालय या रस्त्यावरील लाईट  सुरू करण्यात यावे, चौकात वाहतूक पोलिस ठेवण्यात यावे, रस्त्यावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावे, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या. यावेळी तहसीलदार वरूनकुमार सहारे, पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे उपस्थित होते. रामटेक, देवलापार, कन्हान येथील पोलिसदेखील आंदोलनाची तीव्रता पाहून घटनास्थळी दाखल  झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास आमदार आशिष जैस्वाल आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी भ्रमणध्वनीवर सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तीन दिवसात मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. आमदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात  नगराध्यक्ष प्रतिभा संजय कुंभलकर, सलीम बाघाडे, भुजंग ढोरे, विजय भुते , रुपेश खंडारे यासह ग्रामस्थांनी भाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT