Two died in truck-car accident yavatmal police vidarbha sakal
विदर्भ

Accident News : ट्रक-कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

ट्रक व चारचाकी वाहनामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात युवतीसह तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : भरधाव वेगातील ट्रक व चारचाकी वाहनामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात युवतीसह तरुणाचा मृत्यू झाला. तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी(ता.११) सायंकाळ दरम्यान यवतमाळ-नेर रोडवरील सोनवाढोणा गावाच्या वळणावर घडली.

आचल दयानंद निनावे (वय १९, रा. बोरगाव लिंगा), करण प्रमोद मेडवे (वय २७,रा. चापमनवाडी), अशी मृतांची नावे आहे. साक्षी करवाडे (रा. चापमनवाडी) ही तरुणी गंभीर जखमी झाली. ट्रक यवतमाळकडून अमरावतीला जात होता. तर कार अमरावतीयेथून यवतमाळकडे येत होती.

यावेळी सोनवाढोना जवळ ट्रक व कारमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेतेतील तरुण व एका तरुणीला उपचारासाठी यवतमाळ येथे आणण्यात येत असताना तरुणाचा वाटेत मृत्यू झाला. गंभीर जखमी तरुणीला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला होता. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, या अपघातात कार चकनाचूर झाली. पुढील तपास लाडखेडचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT