Two Divyangs from Wardha will climb Kalsubai peak New year special 
विदर्भ

साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम

गजानन बाजारे

कारंजा घाडगे (जि. वर्धा) : नवीन वर्षात अनेकांकडून काही ना काही संकल्प करण्यात येतो. असाच संकल्प राज्यातील ७० दिव्यांग बांधवांनी केला आहे. ते ३१ तारखेला सह्यांद्री पर्वतावरील कळसूबाई शिखर चढून नव्या वर्षाचे स्वागत करणार आहेत. यात कारंजा येथील दोघांचा समावेश आहे.

कळसूबाई शिखर चढण्यासाठी जाणाऱ्या या चमूत ५८ पुरुषांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्‍यातील उमेश खापरे (रा. सेलगाव लवणे) व हरिभाऊ हिंगवे (रा. कारंजा) हे यात सहभागी होणार आहेत. या मोहिमेत सहभागी उमेश खपरे ७० टक्‍के अपंगत्व तर हरिभाऊ हिंगवे यांना ४० टक्‍के अपंगत्व आहे. हरिभाऊ हिंगवे यांची येथील बसस्थानकाजवळ चहाटपरी आहे.

कळसूबाईचे शिखर सह्याद्री पर्वतावर समुद्रसपाटीपासून १,६४६ मीटर उंचीवर आहे. त्यासाठी त्यांना सहा तासांचा कालावधी लागणार आहे. या चढाईची सुरुवात ते अहमदनगर जिल्ह्यातील बारी या ठिकाणावरून करणार आहेत. याचा सर्व खर्च ते स्वतः करणार आहेत. या साहसी कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्यांना या कार्यासाठी शिव ऊर्जा प्रतिष्ठानचे शिवाजी गाडे यांचे सहकार्य लाभले आहे. 

दिव्यांग बांधवांना कोणीही कमी लेखू नये
दिव्यांग बांधवांना कोणीही कमी लेखू नये यासाठी या अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत व्हावे हा उद्देश ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. 
- उमेश खापरे,
मोहिमेत सहभागी युवक, कारंजा (घाडगे)

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने घेतला आणखी एकाचा जीव! यूपीच्या तीन मुलींनंतर अजून एका मुलानं जीवन संपवलं, काय घडलं?

Malegaon Municipal Corporation : मालेगाव मनपा निवडणुकीत ट्विस्ट! शेवटच्या दिवशी शिवसेनेची एन्ट्री, लता घोडके रिंगणात

Latest Marathi News Live Update : गोरेगावमध्ये लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसचे फुगे

Indigo Airlines Cancels Flights: ‘इंडिगो’ने घेतला मोठा निर्णय! २८ फेब्रुवारीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं केली रद्द

Travel Tips For Parents: विमानात मुलांसोबत प्रवास करायचाय? मग ‘या’ 5 स्मार्ट टिप्स ठेवा लक्षात, ट्रॅव्हल होईल झकास!

SCROLL FOR NEXT