two farmer commits suicide in Amravati
two farmer commits suicide in Amravati 
विदर्भ

सततची नापिकी आणि हाताला नाही काम म्हणून संपवली जीवनयात्रा; हळहळले अख्खे गाव 

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : तालुक्‍यातील दापोरी खुर्द येथील दोघांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. शेतमजुराने 15 जानेवारीला विष घेतले होते. आज त्यांचा मृत्यू झाला. तर शेतकऱ्याने रविवारी (ता.17) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

शेतमजूर दिनेश रूपराव उईके (वय 40), तर शेतकरी सारंगधर महादेव वावरे (वय 52), असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. वाढती महागाई व हाताला काम नसल्याने आर्थिक डबघाईस आलेल्या दिनेश उईके यांनी गावातीलच रस्त्यावर कीटकनाशक प्राशन केले. गंभीर स्थितीत असलेले उईके हे त्यांचे चुलत भाऊ यांना दिसून आले, तेव्हा त्यांना अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र रविवारी (ता. 17) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

तर दुसरी घटना रविवारी (ता. 17) उघडकीस आली. पहाटे शेतात जाणाऱ्या व्यक्तीला शेतातील झोपडीमध्ये शेतकरी सारंगधर वावरे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. दोघांवरही गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक वावरे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगा व मोठा परिवार आहे.

मृतक वावरे यांच्याकडे तीन एकर शेती असून यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे वावरे कुटुंब मोठ्या अडचणीत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली. तर उईके यांनी हाताला काम नसल्याने व आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT