विदर्भ

कडुनिंबाच्या झाडाखाली आश्रय घेणे बेतले जिवावर; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर) : सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. यामुळे शेतकरी व मजूर शेतात व्यस्त असतात. पावसाळ्यात शेतीचे काम वेग घेत असते. मात्र, याच पावसात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. गुरुवारी (ता. १) वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात अंगावर वीज कोसळल्याने दोघांचा जीव गेल्याची घटना चंद्रपूर जिल्‍ह्यातील मूल (Two farmers killed) तालुक्यात घडली. विलास केशव नागापुरे (५०) आणि गयाबाई नामदेव पोरटे (६०) असे मृतांचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Two-farmers-killed-in-power-outage)

मूल तालुक्यात धानाची पेरणी आटोपली जात आहे. शेतात पऱ्हाटी आणि तूर लावण्यासाठी बोंडाळा खुर्द येथील रहिवासी विलास नागापुरे व गयाबाई पोरटे हे सकाळीच शेतात गेले होते. दोघांचेही शेत एकमेकांच्या शेताजवळच आहे. दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोर जोऱ्यात पाऊस येत असल्याने चौघांनी शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. हीच चूक त्यांना भोवली.

चौघे जण झाडाखाली असताना वीज कोसळली. अंगावर वीज कोसळल्याने विलास नागापुरे व गयाबाई पोरटे यांचा भाजून मृत्यू झाला. तर ताराबाई विलास नागापुरे व नामदेव तानू पोरटे हे गंभीर जखमी झाले. तसेच झाडाखाली असलेल्या दोन बकऱ्यांचासुद्धा यात मृत्यू झाला. दोन्ही बकरे विलास नागापुरे यांची असल्याची महिती आहे.

गावात हळहळ

वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच बेंबाळ पोलिस ठाण्याचे चौकीदार, पोलिस उपनिरीक्षक, मूल येथील नायब तहसीलदार आणि बोडाळा खुर्दचे सरपंच यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेत गंभीर जखमी झालेले ताराबाई व नामदेव यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांवर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बोंडाळा खुर्द येथे हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.

(Two-farmers-killed-in-power-outage)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : लव्हस्टोरीतून एमपीएससीचा पेपर फुटला; प्रेमासाठी पेपर फोडल्याने यंत्रणा हडबडून जागी, असं काय घडलं?

गोड साखरेचा कडू इतिहास! युरोपातील राजे-महाराजे 'या' खास कारणासाठी करायचे साखरेचा वापर

कुकू कोहलींच्या अंत्ययात्रेत लेकीनं दिला खांदा; वडिलांना अखेरचा निरोप देताना करिश्मा कोहली भावूक

Panchganga Pollution: ‘एसटीपी’ उभारणीच्या दिरंगाईचा अहवाल द्या; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश; कोल्हापुरात येऊन पाहणी करणार

वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट ड्रीमला मोठा धक्का? राहुल द्रविड यांनी सांगितली मोठी अडचण; म्हणाले, ‘अजून बराच पल्ला गाठायचा आहे’

SCROLL FOR NEXT