death 
विदर्भ

भंडाऱ्यातील आयसोलेशन वार्डात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात बुधवारी (ता. २९) दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांच्या घश्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. मागील आठवड्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, सोमवारी (ता. २७) जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या ५० वर्षीय महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला आयसोलेशन वार्डात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र, काही तासांतच तिचा मृत्यू झाला. त्या महिलेला क्षयरोग झाला होता. खबरदारी म्हणून तिच्या घश्यातील नमुना तपासणीसाठी पाठविल्यात आले आहे. 

आता तरी थांबावे हे व्यसन, खर्‍यामुळे हे गाव बनले आहे ’हॉटस्पॉट’ 
 

तर, दुसरी मृत ३० वर्षीय महिलेला गेल्या तीन दिवसांपूर्वी सर्दी, खोकला होता. मंगळवारी ( ता. २७) सायंकाळी ६.३० वाजता तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. भरती करण्याच्या काहीच तासात या महिलेचा आयसोलेशन वॉर्डात मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला, याविषयी सध्यातरी सांगणे कठीण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

या दोन्ही मृत महिलांच्या घश्याचे नमुने नागपूर ला पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. महिलांच्या मृत्यूला जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : भुजबळ साहेब लवकर बरे व्हा, खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT