Two friends drowned in a well In wardha district Two friends drowned in a well In wardha district
विदर्भ

खेळायला गेलेले मित्र परतलेच नाही; सकाळी फोन आला अन्...

सकाळ डिजिटल टीम

आर्वी (जि. वर्धा) : क्रिकेट खेळायला जातो असे सांगून विहिरीवर (well) पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून (drowned) मृत्यू झाला. देवांश नीलेश घोडमारे (१४, रा. आसोले ले-आउट) व युगंधर धर्मपाल मानकर (१४, रा. साईनगर, आर्वी) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. ५) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. (Two friends drowned in a well In wardha district)

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास दोघेही क्रिकेट खेळायला जातो असे सांगून सायकलने घरून निघाले. सायंकाळ झाली तरी ते घरी परतले नाही. यामुळे कुटुंबीयांनी दोघांचाही शोध सुरू केला. सर्व मित्रांना याची माहिती देण्यात आली. मात्र, ते कुठे गेले याची माहिती मिळाली नाही. यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

शोध सुरू असताना राजेश गुल्हाणे याच्या शेताशेजारील शेतकरी रविवारी सकाळी पाणी पिण्यासाठी विहिरीवर (well) गेला. त्याला मृतदेह (Death) तरंगताना दिसले. तसेच विहिरी शेजारी बॅगा दिसल्याने त्याने पोलिस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

दोघांच्याही कमरेला होते दोर बांधून

दोन्ही मृतदेह विहिरीच्या (well) बाहेर काढले असता त्यांच्या कमरेला दोर बांधून असल्याचे दिसले. यामुळे त्यांना योग्यरीत्या पोहता येत नसल्याचा अंदाज आहे. दोर तुटल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला असावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

ST Bus: एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डचा बॅलन्स संपला तरी चिंता नको; बसमध्येच वाहकांकडून करता येणार टॉपअप

Latest Marathi News Update : गणेश चतुर्थीच्या रात्री बेळगावमध्ये आगीत चार जणांचा मृत्यू

Medical Breakthrough: मानवाच्या शरीरात डुकराचे मूत्रपिंड! ९ महिने डायलिसिसपासून मुक्त राहून रुग्णाने रचला इतिहास, वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम

SCROLL FOR NEXT