Two killed in two accidents in Amravati district
Two killed in two accidents in Amravati district 
विदर्भ

चार गाड्या आणि दोन अपघात; दोघे जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी

संतोष ताकपिरे

अमरावती : जिल्ह्यातील खोलापूर ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. म्हैसपूर व शिंगणापूर फाट्यावर या घटना घडल्या.

दीपक रमेश हिंगणकर (वय ४३, रा. आसरा) हे एमएच २७ एसी ६६९७ क्रमांकाच्या इंडिका कार दुरुस्ती करून गावाकडे जात होते. म्हैसपूर फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच २७ टीसी ०५८/०११ क्रमांकाच्या बोलोरो पिकअप व्हॅनने कारला जोरदार धडक दिली. अपघातात दीपक हिंगणकर गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान दीपक यांचा मृत्यू झाला. खोलापूर पोलिसांनी अशोक रामकृष्ण राऊत (वय ४३) यांच्या तक्रारीवरून पिकअप व्हॅनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अपघाताची दुसरी घटना शिंगणापूर फाट्याजवळ घडली. मनीष राजाराम बेलसरे (वय ३५, रा. सलोना, ता. चिखलदरा) व राजेश देसू भुसूम (वय ३०, रा. अंबापाटी) हे दोघे एमएच २७ क्‍यू ८७१२ क्रमांकाच्या दुचाकीने किराणा घेऊन खोलापुरकडून शिंगणापूर येथे जात होते. पूर्णानदीच्या पुलासमोरील वळणावरून मागून येणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन वाहनासह पळ काढला.

गंभीर जखमी मनीष व राजेश यांना उपचारासाठी गुरुवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यापैकी मनीष बेलसरे यांचा मृत्यू झाला. गजानन नंदकिशोर धुमोने (वय ३२, रा. शिंगणापूर) यांच्या तक्रारीवरून पसार वाहनचालकांविरुद्ध खोलापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT