file photo 
विदर्भ

गोंदियात खुनाचा थरार : दोन मजुरांची झोपेतच निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : शहरातील सिंधी कॉलनी येथे एका नवनिर्माण इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दिवसभर येथे मजूर कार्य करीत असतात. सायंकाळ होताच ते आपापल्या घरी परततात. मात्र, काही मजूर येथेच राहतात. बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेले साहित्य व बांधकामावर लक्ष राहावे म्हणून ते राहतात. मात्र, शुक्रवारी येथे राहणाऱ्या चार पैकी दोन मजुरांची झोपेतच इमारतीत निर्घृण हत्या (Two laborers killed) झाल्याचे समोर आले. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. (Two-laborers-killed-in-Gondia-district)

प्राप्त माहितीनुसार, सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी काही मजुरांनी दिवसभर काम केले. सायंकाळी मजूर आपापल्या घराकडे निघून गेले. मात्र, चार मजूर येथेच थांबले. रात्री स्वयंपाक केल्यानंतर त्यांनी सोबतच जेवण केले. रात्री दहा ते अकरा वाजताच्या सुमारास ते झोपी गेले. मात्र, शुक्रवारचा दिवस उजळताच दोन मजुरांची हत्या झाल्याचे समोर आले.

सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना ही बाब समजली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पाहणी केली. घटनेचा पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे. दोघांची हत्या बलवानने केल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या मजुराने दिली. बलवान फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

दोन पैकी एक मजूर पळाला

गुरुवार व शुक्रवारच्या मध्यरात्री चारपैकी दोन मजुरांची इमारतीत निर्घृण हत्या करण्यात आली. हे हत्याकांड सकाळी उघडकीस आले. दोन्ही मजूर हे उतर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. अमन आणि निरंजन असे निर्घृण हत्या झालेल्या मजुरांची नावे आहेत. तर बलवान असे हत्या करून फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. हत्याकांडानंतर बलवान फरार झाल्याची माहिती आहे. तर एक मजूर घटनास्थळावर आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्याचे समजते.

(Two-laborers-killed-in-Gondia-district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT