Two liquor smugglers arrested in Yavatmal district 
विदर्भ

ऑटो-दुचाकीमधून दारू तस्करी; दोन लाखांच्या मुद्देमालासह दोघे अटकेत

किशोर चवणे

शिंदोला (जि. यवतमाळ) : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सीमावर्ती भागातून सातत्याने दारूची तस्करी होत आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी नाकाबंदीदरम्यान एक ऑटो व दुचाकीची तपासणी शिरपूर पोलिसांनी केली. त्यावेळी त्यात देशी व विदेशी दारू आढळून आली. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन एक लाख ७५ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासिर खा शाबास खा पठाण (वय ३८, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) व राकेश भूपेंद्र रसाली (वय ३३, रा. नवीन वाघदरा, वणी) असे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांची नावे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आल्यानंतर सीमावर्ती भागातून दारूतस्करीला चांगलेच उधाण आले होते. विविध फंडे अवलंबत दिवसाढवळ्या होणारी दारूची तस्करी आचंबित करणारी होती.

मागील काही दिवसांपासून दारू तस्करांच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी सकाळी नाकाबंदीदरम्यान ऑटो क्रमांक एम एच ४० पी १२४०मध्ये विदेशी दारूचे १४४ पव्वे किंमत २१ हजार ६०० व दुचाकी क्रमांक एम एच ३४ ए क्‍यू ६१३० वरून वाहतूक करीत असलेली देशी दारूचे ७२ पव्वे किंमत तीन हजार ७४४ व दोन्ही वाहनांची किंमत एक लाख ५३ हजार ७४४ असा एकूण एक लाख ७५ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक गावंडे, प्रमोद जुणूनकार, सुगद दिवेकर, संजय खांडेकर, अमित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT