संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

दोघांनी लावला आठ लाखांचा चुना, मात्र कशामुळे?

संतोष ताकपिरे

अमरावती : कर्ज काढून घेतलेली जेसीबी मशीन विक्रीच्या व्यवहारात आठ लाखांनी फसवणूक झाली. चांदूररेल्वे पोलिसांनी याप्रकरणी यवतमाळ व नागपूरच्या दोघांविरुद्ध फसवणूक, विश्‍वासघात प्रकरणी गुन्हा दाखल केला.

शेषराज बाबूसिंग राठोड (वय २४, रा. बानगाव, जि. यवतमाळ) व अल्बर्ट युबर्ट (रा. जरीपटका, जि. नागपूर), अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. दिलीप रामाजी चामलाटे (वय ५५, रा. वरुड) यांनी २०१९ मध्ये जेसीबी मशीन विकत घेतली. त्यासाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्यानंतर ३० ऑक्‍टोबर २०१९ रोजी हीच जेसीबी यवतमाळ जिल्ह्याच्या राठोड यांना विकली. विक्रीचा व्यवहार स्टॅम्पपेपरवर नोटरी करून झाला. व्यवहार करतेवेळी तीन लाख वीस हजार एवढी रक्कम चामलाटे यांना दिली.

उर्वरित थकीत असलेले फायनान्स कंपनीचे कर्ज आठ लाख रुपयांचे हे राठोड व त्याच्या साथीदाराने भरायचे होते. राठोड यांनी जेसीबी घेतल्यानंतर आठ महिन्यांपासून थकीत कर्जाचे हप्ते भरले नाही. पूर्वीचे कर्ज चामलाटे यांच्या नावाने असल्याने फायनान्स कंपनीने त्यांच्याच मागे थकीत कर्जासाठी तगादा लावला. त्यानंतर ४ ऑक्‍टोबर २०२० रोजी राठोड व अल्बर्ट यांनी अमरावतीत येऊन एका कारमध्ये बसविले. कोऱ्या स्टॅम्पपेपरवर स्वाक्षरी घेऊन राठोड यांना मध्येच उतरून दिले, असा आरोपही त्यांनी तक्रारीत केला. राठोडसह त्याचा साथीदार अल्बर्ट युबर्ट या दोघांनी जेसीबी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक केली, असे तक्रारीत सांगितल्या गेले. जेसीबी मशीन ही मालखेड, चांदूररेल्वे येथे नेऊन ठेवली. त्यामुळे चांदूररेल्वे ठाण्यात तक्रार नोंदविल्याने गुन्हा दाखल झाला.

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT