अरुणावती नदीला आलेला पूर e sakal
विदर्भ

यवतमाळ : अरुणावती नदीला पूर, बैलगाडीसह तरुण गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी (arni yavatmal) तालुक्यातील अरुणावती नदीच्या पुरात तरुण शेतकरी बैलगाडीसह वाहून गेला. यामध्ये तरुणाला पोहता येत असल्याने तो वाचला. मात्र, दोन्ही बैल पुराच्या पाण्यात वाहत गेल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या लिंगी-सायखेड पुलावर घडली.

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. त्यातच अरुणावती धरणाचे पाणी सोडल्याने अरुणावती नदीला पूर आला होता. लिंगी-सायखेड पुलावर तीन ते चार फूट पाणी होता. त्यातच पाण्याला वेग होता. तरुण सावंगा दिग्रस येथून सकाळी डोळंबा या गावाला जाण्यासाठी बैलगाडीने निघाला होता. गजानन खांदवे यांच्याकडून शेजारच्या गावातील नातेवाईकाने शेत बटईने केले होते. त्यामुळे त्याला शेतीकामांसाठी बैलजोडी पाहिजे होती. बैलजोडी आणण्यासाठी डोळंबा येथील नातेवाईक सुभाष भावसिंग राठोडला पाठविले होते. सुभाष बैलगाडीसह डोळंबाला जायला निघाला. सायखेडा ते लिंगीच्या मधून अरुणावती नदी वाहते. याच नदीच्या पुलावर तीन ते चार फूट पाणी होते. त्यामधून बैलगाडीसह सुभाष वाहून गेला. मात्र, त्याला पोहता येत असल्याने तो काठावर आला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. पण, बैल पुरात वाहून गेल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेचे वृत लिहिस्तोवर कुठलाही पंचनामा किंवा पोलिस तक्रार दाखल केली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधी 'पॅलेट गन' पीडित साहिलला सोबत घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचले; एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप

Ashutosh Ranka Attack : CJP प्रवक्ता आशुतोष रांका यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण; सरकारी शाळेच्या पाहणीवरून राडा, भाजपवर गंभीर आरोप

Shweta Tiwari: राज ठाकरे जर अशी माणसं तुमचे समर्थक असतील, तर! श्वेता तिवारीचा सवाल; म्हणाली, फक्त मराठी बोलणं म्हणजे...

Marathi News Live Updates : पॅलेट गन प्रकरणावरून राहुल गांधी पोहोचले पोलीस ठाण्यात; FIR नोंदवण्याच्या मागणीसाठी ठिय्या

WTC स्पर्धेत जो रुटने केला वर्ल्ड रेकॉर्ड! इतिहासात आजपर्यंत कोणत्यात कर्णधाराला जमलं नव्हतं

SCROLL FOR NEXT