tiger e sakal
विदर्भ

वाघाचा थरार! एकाला मानेला पकडून नेले ओढत, तर दुसऱ्याला झाडावरून खेचले खाली

सकाळ वृत्तसेवा

पाटणबोरी (जि. यवतमाळ) : झरी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्‍या मांडवी बिट येथे सोमवारी (ता. ३१) पुन्हा एकदा वाघाचा थरार (tiger attack) पाहायला मिळाला. एकाच्या मानेला पकडून ओढत नेले, तर दुसऱ्याला झाडावरून खाली ओढले. यामध्ये एकजण गंभीर जखमी (injured in tiger attacked) झाला असून दुसरा थोडक्यात बचावला. (two people injured in tiger attacked in patanbori of yavatmal)

सुधाकर रामभाऊ मेश्राम (वय ३५) व रामकृष्ण कानू टेकाम (वय २२, रा. दोघेही बेलमपल्ली) हे दोघे बैलाला पाणी पाजायला जुनोनी शिवारातील चाटवण नाल्यावर गेले होते. यावेळी अचानक दोन्ही बैलांना वाघ दिसताच ते पळू लागले. यावेळी वाघाने अचानक सुधाकर आणि रामकृष्ण या दोघांवरही हल्ला चढविला. यामध्ये वाघाने सुधाकर याची मान तोंडाने पकडून दूर नेण्याचा प्रयत्न केला. सुधाकरने कशीतरी स्वत:ची सुटका करवून घेतली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रामकृष्ण याने वाघाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. वाघ त्याच्या मागे लागल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी रामकृष्ण हा झाडावर चढला. मात्र, वाघाने रामकृष्णच्या पायाला पकडून त्याला खाली ओढले. त्यामुळे त्याच्या पायाची बोटे पूर्णपणे कुरतडली गेली. दोघेही वाचवा वाचवा ओरडत होते. त्यांचा आवाज ऐकून बैलगाडी घेऊन पाणी पाजण्यासाठी आलेले सहा ते सात शेतकरी मदतीला धावून आले. त्यानंतर वाघाने पळ काढला. त्यानंतर दोघांनाही प्रथम पांढरकवडा आणि नंतर यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT