विदर्भ

एका खाटेवर दोन प्रसूत माता 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातला ‘नवजीवन’ देणारा टप्पा आहे, असे म्हटले जाते. प्रसूतीपूर्व आणि नंतरच्या काळात तिला आहार-विहार-व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यासाठीही विशेष काळजी घेणे जरूरीचे आहे. त्याचप्रमाणे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य उपचार मिळावे हा तिचा हक्क आहे. परंतु, मेडिकलमध्ये महिलांची प्रचंड गर्दी असल्याने एका खाटेवर दोन गर्भवती महिलांना ठेवण्यात येत आहे. 

मेडिकलच्या लेबर वॉर्डात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची प्रचंड गर्दी असते. मेडिकलमध्ये प्रसूती विभागासाठी केवळ १८० खाटा आहेत. मात्र, साडेतीनशेवर गर्भवती महिला भरती आहेत. खाटांची संख्या अद्याप वाढविण्यात येत नाही. अजूनही १८० खाटांवर थांबली आहे. दर दिवशी रुग्णांची संख्या वाढत असून दररोज ३०-३५ प्रसूती होतात. एका खाटेवर दोन महिलांना ठेवण्यात येत असल्यामुळे जीर्ण झालेल्या खाटांचे कंबरडे मोडण्याचीही भीती आहे. 

खाटेवरील बेडशीट हरवल्या 
मेडिकलमध्ये मंत्री महोदयांचा किंवा संचालकांचा दौरा येताच नवीन पांढऱ्या बेडशीट दिसतात. लाल ब्लॅंकेट दिसू लागतात. मात्र, नंतर प्रसूत महिलांच्या खाटांवर बेडशीट दिसत नाही. या बेडशीट कुठे हरवल्या, असे विचारताच उर्मटपणे उत्तर मिळत असल्याची जोरदार चर्चा मेडिकलच्या प्रसूती वॉर्डांमध्ये मिळते. 

वॉर्डात अस्वच्छता 
मेडिकलमध्ये अस्वच्छतेचा प्रश्‍न उभा ठाकला असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेवडे यांनी केली. प्रसूती वॉर्डात बेडशीट तर नाहीत, परंतु येथील स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे त्यांनी पत्रकातून कळविले आहे. यासंदर्भात मेडिकलचे स्वच्छता अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT