file photo
file photo 
विदर्भ

अमरावतीवरून येत होते वाळूमाफिये दोन देशी कट्टे घेऊन, मात्र पुलगावात अडकले पोलिसांच्या जाळ्यात

प्रवीण फुसाटे

 पुलगाव (जि. वर्धा) : वाळूमाफियांचे प्रस्थ असलेल्या पुलगावात देशीकट्टा वापरणाऱ्या दोन वाळूमाफियांना पुलगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून दोन देशीकट्ट्यासह ११ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी (ता. १९) दुपारच्या सुमारास येथील राममंदिर परिसरात करण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.


गणेश रमेश येदबान (वय ४३) आणि अविनाश गणेश खोडे (वय ३०) दोन्ही रा. वाल्मीकनगर, पंचधरा रोड, पुलगाव अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हे दोघे अमरावती येथून पुलगाव येथे येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.


पुलगावात घेतले ताब्यात
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती येथून एमएच ४० यू ९६३८ क्रमांकाच्या दुचाकीने येत असलेल्या दोन युवकांजवळ देशी कट्टे आणि जिवंत काडतूस असल्याची माहिती पुलगाव पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी सापळा रचून या क्रमांकाच्या दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली. त्यांची नावे गणेश येदबान आणि अविनाश खोडे, असे असल्याचे त्यांनी सांगितले.

दोघांकडे नव्हता शस्त्र बाळगण्याचा परवाना

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन देशीकट्टे व काडतूस जप्त करण्यात आले. या दोघांना या शस्त्राच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कुठलाही पुरावा नसल्याने त्यांच्यावर हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव, ठाणेदार रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल कोल्हे, हवालदार राजेंद्र हाडके, खुशाल राठोड, बाबुलाल पंधरे, पंकज टाकोने, स्वप्नील जीवने, शरद सानप, जयदीप जाधव, मुकेश वांदिले, प्रदीप साहाकाटे यांनी केली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT