file photo 
विदर्भ

दोन तालुक्‍यात 35 टक्के रोवण्या अडल्या

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : अपुरा व अनियमित पाऊस झाल्याने आतापर्यंत भंडारा व मोहाडी तालुक्‍यात धानपिकाची रोवणी अडली आहे. भंडारा तालुक्‍यात तब्बल नऊ हजार हेक्‍टर शेती पडीक राहण्याची भीती आहे. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत 80 टक्के क्षेत्रात रोवण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यात चालू खरीप हंगामात एक लाख 80 हजार हेक्‍टर क्षेत्र धानपिकाखाली आणायचे होते. पावसाळ्यात सुरुवातीच्या दोन महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत शेतीची कामे अडली होती.  भंडारा व मोहाडी तालुक्‍यांत यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे 27 ऑगस्टपर्यंत भंडारा तालुक्‍यातील धान पिकाखालील 25 हजार 832 हेक्‍टरपैकी 16 हजार 856 हेक्‍टर क्षेत्रात रोवणी पूर्ण झाली आहे. अजूनही नऊ हजार हेक्‍टरमध्ये रोवणी अडली असून, हे क्षेत्र एकूण पिकाच्या 35 टक्के आहे. तसेच मोहाडी तालुक्‍यात चार हजार हेक्‍टर क्षेत्रात रोवणीचे काम अडले आहे.
तुमसर, पवनी, लाखांदूर तालुक्‍यात 80 ते 83 टक्के रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. लाखनी व साकोली तालुक्‍यांत 90 टक्के क्षेत्रात रोवणी पूर्ण झाली आहे.
सोयाबीनचा पेरा घटला
जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागात शेतकरी सोयाबीनचे पीक घेतात. चालू हंगामात पावसाने सुरवातीला हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना नियोजित कामे वेळेत करता आली नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या क्षेत्रापैकी पेरणीचे क्षेत्र फारच कमी आहे. भंडारा तालुक्‍यात दोन हजार 200 हेक्‍टरपैकी केवळ 96 हेक्‍टरमध्ये पेरणी झाली असून मोहाडी तालुक्‍यात 100 हेक्‍टरमध्ये पेरणी झालीच नाही.
अनियमित पाऊस
यावर्षी जिल्ह्यात कमी व अनियमित पाऊस होत आहे. आतपर्यंत पवनी तालुक्‍यात सर्वाधिक सरासरीच्या 133 टक्के पाऊस झाला. साकोली, लाखांदूर व लाखनी तालुक्‍यांत सरासरीच्या 85 ते 90 टक्के पाऊस झाला. मात्र, भंडारा व मोहाडी तालुक्‍यांत सरासरीच्या 70 ते 74 टक्के पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra History: पावणेदोनशे वर्षांपासून दुर्लक्षित समाधीचा शोध! सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार यांची कबर सापडली; इतिहासप्रेमींना मोठे यश

RANJI TROPHY: न्यूझीलंड दौऱ्याआधी शुभमन गिलचा रणजीत फ्लॉप शो! १ रनवर बोल्ड करणारा अजय मंडल आहे तरी कोण?

Young Farmer Death: सकाळी चहाचे हॉटेल, दुपारी शेतात काम; २२ वर्षीय संतोष राऊतच्या मृत्यूने सिसारखेडा हळहळले

Latest Marathi News Live Update : दुष्काळामुळे सरकारी खर्चात २० टक्के कपातीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; 'लाडकी बहीण' योजनेला मात्र धक्का नाही

Kanya Puja Importance: अष्टमीला कन्या पूजन का केले जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि पूजेची परंपरा

SCROLL FOR NEXT