file photo
file photo 
विदर्भ

वेल्डिंग मशीनसह दोघा चोरट्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा ( जि.नागपूर) : मोहगाव फाटा येथील पुलाच्या बांधकामावरील वेल्डिंग मशीन चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना हिंगणा पोलिसांनी अटक केली आहे. यात चार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले असून दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून ताब्यातून चोरीच्या मशीनसह त्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विपीनकुमार रामेश्वर झा यांनी हिंगणा पोलिसांत मोहगाव फाटा येथे पुलाचे कामावरील साहित्य चोरी गेल्याची तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. गुन्हे प्रगटीकरण विभागाचे पोलिस हवालदार विनोद कांबळे यांच्या पथकाने आरोपी व चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेतला. संशयाच्या आधारावर गंगाधर ऊर्फ गंगा केशव वर्मा (वय 30, रा. रडके ले-आउट) व सोमेश भारत गोंद्या (वय 20, रा. बालाजीनगर, एमआयडीसी, नागपूर) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आणखी दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे कबुली दिली. त्यांना अटक करून चोरून नेलेली वेल्डिंग मशीन जप्त केली. गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी, पोलीस उपनिरीक्षक विनोद नरवाडे, नायक पोलिस शिपाई अभय पुडके, सोमेश्वर वर्धे, ध्रुव पांडे, राहुल पोकळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT