दारव्हा (जि. यवतमाळ) : येथील बसस्थानक परिसरातील वाहतूक नियंत्रकाच्या कार्यालयाजवळ एक बॅग बेवारस स्थितीत पडून असलेली एका वाहकाला दिसली. त्यामुळे बसस्थानक परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बेवारस बॅगेबाबत वेगळाच संशय आला.
ही बाब तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली. तेव्हा लगेच गस्तीवरील पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बॅग ताब्यात घेऊन उघडली असता त्यामध्ये दोन जिवंत कासव आढळून आले.
कासवांच्या शरीरावर स्वस्तिक
या बॅगमध्ये एक छोटा व मोठा कासव होता. या दोन्ही कासवांची मांत्रिकांनी पूजा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या शरीरावर स्वस्तिक काढण्यात आले होते. त्यामुळे नक्कीच गुप्तधन शोधण्यासाठी या कासवांना पकडून आणले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु या कासवांना बेवारस स्थितीत बसस्थानकावर का सोडले असावे, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
"त्या' टोळीचा शोध सुरू
दारव्ह्यात आढळलेल्या बेवारस बॅगेत दोन कासव सापडले. या कासवांचा वापर गुप्तधन शोधण्यासाठी मांत्रिकांनी केला असावा, असा कयास लावला जात आहे. मात्र कोणतीही संशयित व्यक्ती आढळली नाही. त्यामुळे या टोळीच्या मागावर पोलिस आहेत. ही बॅग बसस्थानकावर कशी आली? ती कोणी आणली याचाही शोध पोलिस घेत आहेत.
या घटनेमुळे तालुक्यात गुप्तधन शोधणारी एखादी टोळी तर सक्रिय झाली नसावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान पोलिसांनी या कासवांना वनविभागाकडे सुपूर्द केले. वन अधिकाऱ्यांनी या दोनही कासवांना तलावात सुरक्षितरीत्या सोडून दिल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी चेतन नेहारे यांनी सांगितले. या प्रकरणाची पोलिस आणि वन विभाग चौकशी करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.