file photo 
विदर्भ

दोन ग्रामसेवक "एसीबी'च्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : ग्रामपंचायत भवनाचे बिल काढून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागून खासगी व्यक्तीमार्फत 25 हजारांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक जाळ्यात अडकला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने आज, बुधवारी आर्णी तालुक्‍यातील सुकळी येथे केली. उमरखेड येथेही ग्रामसेवक जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.
ग्रामसेवक नरहरी बाबाराव राठोड आणि गजानन देवीदास जाधव (दोघेही रा. सुकळी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुकळी येथे ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम करण्यात आले. या बांधकामाचे बिल काढून धनादेश देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी ग्रामसेवक राठोड याने केली. तडजोडीअंती लाचेचा पहिला टप्पा 25 हजार रुपये धनादेश दिल्यानंतर व उर्वरित रक्कम नंतर स्वीकारण्याचे मान्य केले. ग्रामसेवकाच्या सांगण्यानुसार खासगी व्यक्ती गजानन जाधव याने रक्कम स्वीकारताच ताब्यात घेण्यात आले.
घरकुलाच्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी लाच मागणाऱ्या उमरखेड तालुक्‍यातील करंजी येथील ग्रामसेवकाला आज, बुधवारी दुपारी दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. संजय चाटे असे या ग्रामसेवकाचे नाव असून त्याने रमाई घरकुल योजनेंतर्गत करंजी येथील लाभार्थ्याला हप्ता मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानुसार आज दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ढाणकी-बिटरगाव रस्त्यावरील करंजी फाट्याजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

HDFC Bank: एचडीएफसी बँकेला मिळाले नवे प्रमुख! अनूप बागची सांभाळणार एमडी आणि सीईओ पदाची धुरा

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

SCROLL FOR NEXT