विदर्भ

बोंडअळी नियंत्रणासाठी आता "टायकोकार्ड'

वीरेंद्र जोगी
नागपूर : झाडाच्या पानाखाली एक कार्ड चिटकविले तरी बोंडअळीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते काय, याची चाचणी सध्या केली जात आहे. नागपूर जिल्ह्याच्या उमरेडमधील पाच गावांतील शेतकऱ्यांना "टायकोकार्ड'चे वाटप करण्यात आले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास उत्पादन खर्चात बचत होणार आहे.
"टायकोग्रामा चिलोनीस' हा परजिवी बोंडअळीचे जीवनचक्र संपवू शकतो हे संशोधनातून समोर आले आहे. यानंतर कृषी शास्त्रज्ञांनी कपाशीवर याचा वापर कसा करता येईल, यासाठी चाचण्या घेणे सुरू केले. विशेष म्हणजे हे करताना कमीत कमी रसायनांची फरवारणी कशी करता येईल, याकडेही शास्त्रज्ञांचे लक्ष आहे. मागील वर्षी या प्रयोगाचा पहिला टप्पा पार पडला असून यावर्षी दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना टायकोकार्डचा वापर केल्याने 25 टक्‍क्‍यांपर्यंत बोंडअळी नियंत्रणात आल्याचे समोर आले आहे. या चाचण्या उमरेड तालुक्‍यातील बंदोली, बोथली, चारगाव, सुराबर्डी व मुरादपूर येथे सीआयसीआर करीत आहेत.
देशभरातील 28 जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच गावांत हा प्रयोग राबवून त्याची आकडेवारी गोळा केली जात आहे. सीआयसीआरचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे व प्रकल्प प्रमुख डॉ. विष्लेश नगराळे हे या चाचण्यांवर लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात सुरू असलेला प्रयोग सीआयसीआर-कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुभाष पाटील, संशोधन सहायक कमलाकर चापले, अभिषेक पातुरकर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. प्रयोगात सहभागी असलेले कमलाकर चाफले म्हणाले, की या प्रयोगामुळे मागील वर्षीच्या तुलनेत 25 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बोंडअळी नियंत्रणात आली. विशेष म्हणजे आम्ही नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करण्यावर भर देत आहोत.
काय आहे टायकोकार्ड?
"टायकोग्रामा चिलोनीस' हा परजिवी बोंडअळीचे अंडे फस्त करून त्यावर जगणारा परजीव आहे. हा परजिवी अळीच्या अंड्याच्या आत जाऊन बोंडअळीचे जीवनचक्रच संपवितो. "टायकोग्रामा चिलोनीस' हा परजीवी झाडापर्यंत पोचावा यासाठी एक चिप तयार करण्यात आली आहे. त्यास "टायकोकार्ड' हे नाव दिले आहे. एकराला एक चिप या प्रमाणे त्याचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करण्यात येत आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 'राष्ट्रवादी’तर्फे आज निदर्शने

Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

SCROLL FOR NEXT