udhav thakare says, Transport from Nagpur to Shirdi from Maharashtra Day 
विदर्भ

थोबाडात हाणण्याची भाषा करणारे मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल २५ ऑक्टोबर २०२० च्या दसरा मेळाव्यात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीची लेखी तक्रार भाजपच्या वतीने यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानामुळे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर राणे यांच्याविरुद्घ गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मात्र, भाजप आणि शिवसेनेत सुरू झालेला वाद आणखीच चिघळत चालला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शिवाय जातीय दंगे निर्माण व्हावी, अशी भूमिका मुख्यमंत्री यांची होती.

वादग्रस्त वक्तव्य करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आदित्यनाथ यांचा अपमान केला असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे सरचिटणीस राजू पडगीलवार यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केली आहे. जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

संघर्ष पुन्हा वाढण्याची चिन्हे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर शिवसैनिकांनी मंगळवारी महाराष्ट्रभर मोर्चे, आंदोलने करून विरोध केला. बुधवारी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

काय होते अपशब्द

‘आमचे दैवत शिवाजी महाराजांना हार घालायला हा योगी चप्पल घालून जातो. वाटते तर असे की, तीच चप्पल घ्यावी आणि त्याच्या थोबाडात हाणावी.’ असे ठाकरे यांनी म्हटल्याचा व्हिडिओ बुधवारी भाजपने व्हायरल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावे, आशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT