The Ujjwala scheme stopped the supply of kerosene to the poor sakal
विदर्भ

उज्ज्वलाने केला रॉकेलचा पुरवठा बंद!

दर वाढल्याने सिलिंडर झाले शो-पीस, अनुदानही बंद

मोहम्मद मुश्ताक

चांडोळ : गरिबांच्या हितासाठी शासन अनेक कामे करीत असल्याचा समाजमाध्यमातून प्रचार करीत असते. मात्र गरिबांच्या विकासासाठी असलेल्या कित्येक योजना फोल ठरत आहे. अशाच उज्वला योजनेचा फटका जनतेला बसला असून, आता गरिबांची चूल व दिवाही बंद पडला आहे. शासनाने सुरू केलेल्या उज्वला गॅस योजनेमुळे गोरगरिबांना केला जाणारा रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर आता सिंलिडरची किंमत वाढल्यामुळे योजनेअंतर्गत देण्यात आलेले सिंलिडर शो पीस म्हणून घरात पडून जळतनावर नागरिक आले आहे.

देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुकीमुळे धूर पसरून तो महिलांच्या फुफुसात जात असून अनेक महिलांना विविध विकाराचा सामना करावा लागतो. तसेच दमा व इतर आजारांनाही महिलांना बळी पडावे लागते. त्यामुळे शासनाने उज्वला योजना आणून ९० टक्के घरामध्ये गॅस सिलिंडर पोहोचविला. यासाठी मात्र गरिबांचे हक्काचे केरोसीन बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चिमनिभर रॉकेलसाठी इकडे - तिकडे भटकावे लागत आहे. सरपण पेटविण्यासाठी व शेतात जागल करण्यासाठी शेतकरी रॉकेलचा दिवा पेटवीत होते. मात्र, आता रॉकेल पुरवठाच बंद करण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांना विविध अडणींचा सामना करावा लागत आहे. विजेची समस्या झाली तर, शहरात बॅटरी व इन्व्हर्टरचा उपयोग करतात. मात्र अठराविश्व दारिद्र्य अवस्था असलेल्या गोरगरीब जनतेच्या घरात चिमणीभर रॉकेल सुद्धा मिळत नाही.

उज्वला पूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांच्या अंगणात व घरात रॉकेलचा दिवा पेटविला जात होता. परंतु आता रॉकेल बंद केल्याने हे दिवेही दिसेनासे झाले आहेत. शेतीच्या कामाकरिता काही ठिकाणी शेतकर्‍यांना अनुदानावर शेती उपयोगी यंत्रे पुरविण्यात आली. त्यात काही केरोसीनवर चालणार्‍या यंत्राचाही समावेश आहे. तसेच शेतीला सिंचन करण्यासाठी काही शेतकर्‍यांनी शेतात इंजिन बसविले आहे.

या इंजिनमध्ये रॉकेल टाकल्यावर सिंचन करता येत होते. मात्र रॉकेलअभावी आता हे इंजिन शेतातच धूळखात पडले आहे. कारण डिझेलचे दर सुद्धा गगनाला भिडले आहे. शासनाने व वनविभागाने जंगलतोड रोखावी यासाठी ही योजना अंमलात आणली. अनेक महिलांना या योजनेअंतर्गत गॅसचे वाटपही करण्यात आले. तसेच काहींना सबसिडी देण्यात आली नाही. सध्या सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून पुन्हा महिला आता सरपण गोळा करण्यासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र दिसून येते.

दर महिन्याला सिलिंडरच्या दरात वाढ

दर महिन्याला सिलिंडरच्या दराचा महागाईचा भडका उडत आहे. आज रोजी घरगुती सिलिंडर ९०५ रुपयात मिळत आहे. त्यात सबसिडी मिळणे सुद्धा बंद झाली आहे. त्यामुळे एवढे महाग सिलिंडर सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याची चर्चा नागरिक करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT