Devendra Fadnavis sakal
विदर्भ

Devendra Fadnavis : मोदींच्या नेतृत्वात भारत क्रमांक १ वर येईल

महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या आलापल्ली येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - २०१३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारत ११ व्या क्रमांकावर होता. पण अवघ्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली. आता पुन्हा सरकार आल्यावर त्यांच्या नेतृत्वात भारत क्रमांक एकची अर्थव्यवस्था होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या आलापल्ली येथील प्रचार सभेत ते बोलत होते. या प्रचार सभेला राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, शिवसेनेचे राकेश बेलसरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शिवसेनेच्या वर्षा मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋतुराज हलगेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, साधारणपणे दहा वर्षे एखादे सरकार राहिल्यावर त्याच्याप्रती विरोधाची भावना असते. पण भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडत आहे की लोक म्हणतात या सरकारला जास्त जागा मिळतील. लोकं सरकारच्या बाजूने आहेत. मोदींनी दहा वर्षांत देश परीवर्तीत करून दाखवला. दहा वर्षांत २५ कोटी लोकं गरीबी रेषेच्या वर आले.

गरीब कल्याणाचा अजेंडा केवळ कागदावर नाही. मोदींनी २० कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणले आहे. यात सर्वाधिक अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी आहेत. ४० कोटी लोकांना शौचालयाची सोय झाली. १० कोटी घरांमध्ये गॅस पोहोचला. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर असे लोक होते ज्यांच्याकडे नळ नव्हता. त्यांना शुद्ध पाणी देण्याचे काम मोदींनी केले.

आयुष्यमान भारत योजनेतून देशातल्या ५० कोटी लोकांना पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये देश ११ व्या क्रमांकावर होता मोदींनी ५ व्या क्रमांकावर आणला. गरीबाच्या कल्याणातून देशाचा विकास करण्याची नवी प्रथा त्यांनी पाडली. त्यांना केवळ भारतात नाही, तर जगातील लोकप्रिय नेता म्हणून पाहिले जाते, असेही ते म्हणाले. या सभेला महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यात जलमार्ग होईल....

गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम असला तरी येथे अनेक मोठ्या नद्या आहेत. या नद्यांचा वाहतुकीसाठी उपयोग होईल काय, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून एका कंपनीशी बोलणे सुरू झाले आहे. लवकरच येथे जलमार्गाने वाहतूक सुरू होईल. त्यामुळे गडचिरोली रस्त्याने, रेल्वेने, विमानाने आणि जलमार्गाच्या माध्यमातून जहाजानेही जोडला जाईल. येथील माल जगभरात नेता येईल, उद्योग वाढेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT