Under the pretext of helping the woman was made unconscious and tortured 
विदर्भ

मदतीच्या बहाण्याने महिलेला बेशुद्ध करून केला अत्याचार; डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल

संतोष ताकपिरे

अमरावती : व्याजाने पैसे मिळवून देण्याचे आमिष देऊन वाहनात बसविले. त्यानंतर पाण्यामधून औषध देऊन बेशुद्ध केले. बेशुद्धीनंतर त्याच कारमध्ये चांदूररेल्वे मार्गावर नेऊन महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी डॉक्‍टरविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. लच्छुराम जानवानी (वय ४८, रा. ताजनगर) असे अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. महिला (वय २६) उपचारासाठी सदर डॉक्‍टरच्या ताजनगर येथील रुग्णालयात गेली होती. डॉक्‍टरने तपासणी करून रक्तदाब वाढल्याचे सांगितले. महिलेने कोरोना काळात काम नसून, पैशाची गरज असल्याचे गाऱ्हाणे डॉक्‍टरकडे मांडले.

‘मित्र व्याजाने पैसे देतो’, असे सांगून त्याला भेटण्यासाठी महापालिकेच्या शाळा क्रमांक १३ जवळ बोलविले. महिला घटनास्थळी पोहोचली असता संशयित डॉ. जानवानी याने स्वत:च्या कारमध्ये बसवून तिला नाष्टा व पाण्याची बॉटल दिली.

महिलेने पाणी पिताच तिला गुंगी आली. त्यानंतर कारने चांदूररेल्वे मार्गावर निर्जनस्थळी नेऊन बळजबरीने डॉक्‍टरने अत्याचार केला, असा आरोप पीडितेने फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल तक्रारीत केला. प्रकरणी पोलिसांनी बुधवारी (ता. नऊ) संशयित डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लवकरच अटकेची कारवाई 
पीडितेने तक्रारीत सांगितलेल्या घटनाक्रमाच्या आधारे पोलिसांनी डॉक्‍टरविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याच्या अटकेची कारवाई केली जाईल.
- पुंडलिक मेश्राम,
पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: कर्णधारपदाची सवय झाली आहे! Shubman Gill चा विंडीजच्या खांद्यावरून ऑस्ट्रेलियावर निशाणा, म्हणाला...

Javed Akhtar : माझी मान शरमेने खाली गेलीये! तालिबानी मंत्र्यांच्या स्वागतावरून संतापले जावेद अख्तर, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ रवाना

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा! 13 वर्षीय मुलीवर भावाने केला अत्याचार, दोन मित्रांचाही सहभाग; निर्जनस्थळी नेलं अन्...

संकल्पना सोप्या करणे ‘एआय’चे काम

SCROLL FOR NEXT