ganesh_idols 
विदर्भ

देव घडविणाऱ्या हजारो हातांवरच बेरोजगारीचे संकट

चेतन देशमुख

यवतमाळ : विघ्नहर्त्या श्रीगणेशाच्या आगमनाचा मुहूर्त अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. परंतु, यंदाचा श्रीगणेशोत्सव कोरोनाच्या गर्द काळ्या छायेच्या सावटाखाली साजरा होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा मूर्तीशाळांमधून श्रीगणेश मूर्तींची निर्मिती अत्यंत संथगतीने होत आहे. टाळेबंदीमुळे बसलेला फटका व त्यात श्रीगणेश मूर्तीच्या उंचीसाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांमुळे जिल्ह्यातील मूर्तीशाळा चालकांना तब्बल एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचे आगामी सण-उत्सवांवर सावट आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. उत्सवकाळात ती लागू असणार आहे. दुसरीकडे या महत्त्वाच्या उत्सवांवरच वर्षभराचे नियोजन करून देवदेवतांची मूर्ती घडविणारेच हवालदिल झाले आहेत. श्रीगणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन व नवरात्रोत्सव कोरोनाच्या संकटात असल्याने या मूर्तीकारांपुढे अडचणींचा डोंगर उभा आहे.

यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात 200 च्या जवळपास मूर्तीशाळा आहेत. या मूर्तीशाळांमधून हजारो मूर्तीकार व त्यांना सहायक म्हणून काम करणारे कामगार काम करतात. एकट्या यवतमाळ शहरात आजच्या घडीला छोट्या-मोठ्या 80 मूर्तीशाळा अस्तित्वात आहेत. परंतु, या मूर्तीशाळांच्या संचालकांसमोर यंदा कोरोनाचे महासंकट उभे राहिले आहे. मूर्ती करण्यासाठी लागणारे साहित्य टाळेबंदीमुळे मिळाले नाही. म्हणून आहे त्या किंवा यवतमाळच्या बाजारपेठेत जे उपलब्ध झाले, त्याच साहित्यावर मूर्तीकलेचे काम सुरू आहे. त्यामुळे मूर्तीशाळांमधून मूर्ती बनविण्याचे काम अत्यंत संथगतीने होत आहे. याचा परिणाम आकर्षक व विविध आकाराच्या मूर्ती बनविणाऱ्यांवर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. राज्यात मूर्तीकलेचे काम विविध ठिकाणी केले जाते. परंतु, विभागनिहाय मूर्तीकलेचे व त्या ठिकाणी असलेल्या मूर्तीशाळांचे वेगळे हब तयार आहे. इतर जिल्ह्यांतही या ठिकाणांहून मूर्ती नेली जाते.

प्लास्टरबंदीमुळे मोठ्या मूर्तींचे काय?
सहसा मोठी श्रीगणेश मूर्ती तयार करण्याचे काम नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत सुरू होते. यंदाही जिल्ह्यातील बहुतांश मूर्तीकारांनी मोठ्या व ऑर्डरच्या मूर्ती तयार केलेल्या नाहीत. परंतु, राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणल्याने या मूर्तींचे आता पुढे काय, हा प्रश्न मूर्तीकारांना पडला आहे. दर वर्षी प्लास्टरच्या श्रीगणेश मूर्ती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, गेल्या वर्षी शहरात बंदी घातल्याने यंदा प्लास्टर मूर्तीची संख्या घटण्याची शक्‍यता आहे.

सविस्तर वाचा - इतरांच्या आयुष्यात उजेड पेरणारी माणसं

कामगारांचा रोजगार सुटला
मूर्तीकलेचे काम दरवर्षी डिसेंबरपासून सुरू होते. ते काम श्रीगणेशोत्सव सुरू होण्यापर्यत चालते. वर्षातील सहा ते सात महिने या कामगारांच्या हातांना काम असते. परंतु, यंदा मूर्तीशाळांमध्ये मूर्ती बनविण्यासाठी साहित्यच नसल्याने मूर्तीशाळा चालकांनी कामगारांनाही बोलविले नाही. दरवर्षी एका मूर्तीशाळेत 20 ते 25 कामगारांच्या हातांना काम असायचे. आता ते काम चार ते पाच जणांवरच भागविले जात आहे.

मूतीची ऑर्डरच नाही
यंदा टाळेबंदीमुळे मूर्ती तयार करण्याचे काम अर्ध्यावरच आलेले आहे. मी दरवर्षी तीनशे ते चारशे छोट्या व दहा ते 12 ऑर्डरच्या मोठ्या मूर्ती करायचो. यंदा आतापर्यंत एकही मूर्ती तयार केली नाही. कोरोनामुळे सार्वजनिक व घरगुती एकाही मूर्तीची ऑर्डर आलेली नाही.
विजय माहुरे, मूर्तीकार, बोरी अरब.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray-Eknath Shinde: Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

Nashik News : 'नो पार्किंग'चे फलक फक्त शोभेचे! सिडकोमध्ये वाहने सर्रास थांबवली जातात

Wani News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वडिलांचा मृत्यू; मुलाचा आरोग्य केंद्रात आत्मदहनाचा प्रयत्न

Katraj Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादन कामाला मिळणार गती; कात्रजमधील मोजणी प्रक्रिया पूर्ण, कोंढव्यातील काम सुरु

SCROLL FOR NEXT