Union Home Minister Amit Shah to visit Nagpur for the first time on Thursday 
विदर्भ

सत्ता गमावल्यानंतर भाजपचे चाणक्य नागपूर  दौऱ्यावर, हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतर नाट्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी प्रथमच नागपूरला येत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी खास बातचीत करणार असल्याचे समजते. त्यामुळे शहा यांच्या दौऱ्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

राज्यातील सत्तास्थापनेदरम्यान घडलेल्या घडामोडींवर अमित शहा यांनी अनेक दिवस मौन पाळले होते. केंद्रातील बड्या नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करण्यास पुढाकार घेतला नाही तसेच हातचे राखून हस्तक्षेप केला. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता की नाही याचाही अद्याप खुलासा कोणी केला नाही. फक्त देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे प्रचारसभांमधून सांगण्यात येत होते तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, अशी विचारणा करून अमित शहा यांनी या वादतून अंग काढून घेतले होते. 

या घडामोडी घडत असताना नितीन गडकरी हेसुद्धा नागपूर आणि मुंबईत होते. महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल असेच ते सांगत होते. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयोगही केला होता. मात्र तो फसला. त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाआघाडी स्थापन करून राज्यात सत्तास्थापन केली आहे. देशातील महत्त्वाचे राज्य गमावल्यानंतर अमित शहा प्रथमच नागपूरला येत आहेत. नॅशनल सर्व्हिस फायर कॉलेजच्या नव्या कॅम्पसचे उद्‌घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे. 

हा सोहळा गुरुवारी होणार असून शहा दिवसभर मुक्कामी राहणार आहेत. ते दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 3) दिल्लीला जाणार आहेत. या दरम्यान नितीन गडकरी यांच्याशी राज्यातील राजकीय घडामोडींवर बातचीत करणार असल्याचे समजते. नव्या वर्षात नागपूरकरांना सदर येथील उड्डाणपुलाची भेट केंद्र सरकारकडून मिळणार आहे. या पुलासोबतच नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

Marathi News Live Updates : बहुचर्चित सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा अखेर बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Kolhapur Land Fraud : मळवीवाडी जमीनप्रकरणी आरोपीची जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी;शिक्का ताब्यात, वरिष्ठांनी घेतली माहिती

SCROLL FOR NEXT