daru vikri
daru vikri 
विदर्भ

Video : दारूबंदी असलेल्या गांधीजींच्या वर्धा जिल्ह्यात महिलेने भर बाजारात का विकली दारू? पोलिसमामाही गोंधळले

सकाळवृत्तसेवा

वर्धा : राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. तरीदेखील एका महिलेने भर बाजारात दारू विक्रीला मांडल्याने सर्वत्र एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिस कर्मचारी देखील चांगलेच गोंधळले.

घरात मुलीचे लग्न, एकटीच महिला कमावती. पती आणि मुलगा दारूच्या आहारी गेल्याने कुटुंबाची वाताहात झालेली. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या घरातील कर्त्या महिलेने गुरुवारी (ता. 20) गावात थेट दारूविक्रीचे प्रतीकात्मक आंदोलन केले. वायफड पारधी बेड्यावर झालेल्या या आंदोलनाने जिल्ह्यातील दारूबंदीचे वास्तव पुन्हा एकदा पुढे आले. 

दारूबंदीच्या या अनोख्या आंदोलनाची माहिती होताच पुलगाव ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी वायफड येथे धडकले. गावात भर चौकात आंदोलन करणाऱ्या या महिलेची आणि तिला साथ देणाऱ्या महिलांची येथील समाजमंदिरात समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी गावात शांतता समितीची सभा झाली. गावात दारू विकणाऱ्यांची नावे द्या, कारवाई करतो, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले.

त्रस्त महिलेने केली प्रतीकात्मक दारूविक्री
वायफड येथील आशाबाई उईके या रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा आणि पती दारूच्या आहारी गेले आहेत. त्यांना अनेकवेळा समजावले; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर संतापून आशाबाई या पोलिस ठाण्यात गेल्या. गावात दारूबंदी करण्याची पोलिसांना मागणी केली. मात्र, परिस्थिती "जैसे थे'च राहिली. ही गोष्ट त्यांनी गावातील बचतगटाच्या महिलांना सांगितली. यातून या आंदोलनाची सुरुवात झाली. 

वायफड पारधी बेड्यावरील घटना 
गावातील भरचौकात एक महिला हातात गावठी दारूची डबकी घेत दारू विकत असल्याचे दिसताच चौकात बघ्यांची चांगलीच गर्दी झाली. सुरुवातीला हा प्रकार कोणाला कळलाच नाही. दारूबंदीविरुद्ध हे आंदोलन असल्याचे कळाल्यावर चर्चेला उधाण आले. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

गावात ग्रामरक्षा दल वाढविणार 
पोलिसांच्या वतीने गावात दारूबंदी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पण, गावाजवळील बेड्यामुळे त्रास आहे. कारवाई केली जाते; पण पुन्हा दारूविक्री सुरू केली जाते. यामुळे गावात ग्रामरक्षा दल वाढवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावात पोलिस बंदोबस्त वाढविणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 

संबंधित महिला पोलिस ठाण्यात आली होती. सकाळी गावात जाऊन आलो. शांतता होती. दुपारी या महिलेने आंदोलन केले. तिच्याकडे असलेल्या डबकीत दारू नव्हे तर पाणी होते. या महिलेला दारूबंदीच्या कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. 
- रवींद्र गायकवाड,ठाणेदार, पुलगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT