forest 
विदर्भ

सायंकाळी जंगलात गेलेल्या युवकासोबत घडली थरारक घटना, मग...

सकाळवृत्तसेवा

पाटण (चंद्रपूर) : गावातील चार युवकांसह जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या एका युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना जिवती तालुक्‍यातील नारपठार (विजयगुडा) येथे शुक्रवारी (ता. 10) घडली. मृताचे नाव सोमराज इशरू सिडाम (21)असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमराज, शंकर आत्राम, लिंबाराव कुमरे आणि राजू कुमरे हे चार युवक गुरुवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान गावापासून अंदाजे चार किमी अंतरावर असलेल्या जंगलात लाकडे आणण्यासाठी बैलबंडी घेऊन गेले होते. जंगलात पोहोचताच चढावावर बैलबंडी सोडून लाकडे जमा करण्यासाठी शेताकडे निघाले. अचानक समोरून आलेल्या काही जणांनी सोमराजवर हल्ला केला. त्यामुळे त्याचे सहकारी जंगलातून गावच्या दिशेने पळाले.

घडलेली हकिकत गावकऱ्यांना सांगितली. तेव्हा गावातील काहीजणांनी जंगलाकडे धाव घेतली. जंगलात शोधाशोध केली. मात्र, सोमराज कुठेच मिळाला नाही. चार युवकांनी ज्यांच्या शेतात लाकडे तोडली, त्या शेतमालकाच्या घरी जाऊन विचारपूस करण्यात आली. मात्र, त्याने आपण घराकडे परतल्याचे सांगितले. गावकरी गावाकडे परत येत असतानाच त्यांना गावालगत असलेल्या शेतात सोमराज गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले.

त्यामुळे गावकरी त्या दिशेने पळाले. त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने मारहाण झाल्याचे सांगितले. सोमराजचा पहाटे चार वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार उपविभागीय पोलिस आधिकारी विलास यामावार, जिवतीचे ठाणेदार विश्‍वास पुल्लरवार यांनी पोलिस कर्मचारी घेऊन घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गडचांदुरला पाठविण्यात आला. वृत्तलिहेपर्यंत अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध जिवती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे ठाणेदार विश्‍वास पुल्लरवार करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT