Maize crop loss by unseasonal rain
Maize crop loss by unseasonal rain sakal
विदर्भ

Amravati Rain : अवकाळीचा धारणी, चिखलदरा तालुक्यास फटका; पावसामुळे मक्याचे पीक झोपले

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - गेल्या चोवीस तासांत झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यास बसला. या दोन्ही तालुक्यात २२७८ हेक्टर क्षेत्रातील चणा व गव्हाचे अतोनात नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी जिल्ह्यात ६.१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात तुलनेने अवकाळीचे प्रमाण अधिक आहे. धारणी तालुक्यात सरासरी २५ मिमी चिखलदरा तालुक्यात १६.१, नांदगाव खंडेश्वरमध्ये १९.८ मिमी पाऊस झाला. या पावसाने सर्वाधिक नुकसान धारणी व चिखलदरा तालुक्यात झाले आहे.

धारणी तालुक्यातील २१४९ व चिखलदरा तालुक्यातील १२९, अशा एकूण २२७८ हेक्टरमधील चणा व गव्हाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे. फेब्रुवारी महिन्यातील ही दुसरी वेळ असून यापूर्वी ११ फेब्रुवारीस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: ठाण्यात नौपाडामधील ईव्हीएम मशीन बंद, मतदार संतापले

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT