House Collapse by unseasonal rain sakal
विदर्भ

Mokhada Rain : सलग चौथ्या दिवशी अवकाळीने मोखाड्याला झोडपले; 65 हून अधिक घरांचे नुकसान

गेली चार दिवसांपासून मोखाड्यात अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात कोसळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा - गेली चार दिवसांपासून मोखाड्यात अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात कोसळत आहे. पहिले दोन दिवस तुरळक पाऊस पडला आहे. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी कोसळलेल्या अवकाळी वादळी पावसाने मोखाड्याला झोडपले आहे. काही भागात गारपीठ ही झाली आहे.

या वादळी पावसाने तालुक्यातील 65 हुन अधिक घरांचे नुकसान होऊन, वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. या वादळी पावसाने आणि गारपीठीने लोकसभा निवडणुकीचा प्रचार ही गारठला आहे. 

मोखाड्यात ऊन्हाच्या काहीलीने त्रस्त झालेल्या नागरीकांना अवकाळी पावसाने, हवेत गारवा निर्माण करून दिलासा दिला आहे. तालुक्यात दोन दिवस तुरळक पाऊस पडला आहे. मात्र, सोमवार आणि मंगळवारी 13 व 14 मे ला तालुक्यात मुसळधार वादळी पाऊस कोसळला आहे. काही भागात गारपीठ ही झाली आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तर जोशात आलेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार गारठला आहे. 

सलग चार दिवस झालेल्या अवकाळी वादळी पावसाने तालुक्यातील डोल्हारा साखरवाडी येथील भगवान दापट, सिताराम दोरे यांच्या घरावरील तसेच ब्राम्हणगांव येथील शाळेचे छप्पर ऊडाले आहे. सावर्डे येथील यादव पादीर, चंद्रकांत पादीर यांचे घरांचे नुकसान झाले आहे.

तर भोवाडी येथील नवसु दिघा यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराची पडझड झाली आहे. येथे सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. पाचघर मध्ये ही घरांचे नुकसान झाले आहे. यांसह तालुक्यात सुमारे 65 हुन अधिक घरांचे नुकसान आणि पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे.

तालुक्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती घेत, तलाठी पंचनामे करत आहेत. त्याबाबतची माहिती तातडीने तहसीलदार कार्यालयाला कळविली जात आहे. तालुक्यात 65 हुन अधिक घरांचे किरकोळ नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसीलदार मयुर खेंगले यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT