Urea Fertilizer 
विदर्भ

शेतकऱ्यांवरील संकट कमी होईना; या खताने वाढविले त्यांचे टेंशन 

राजेश भितकर

यवतमाळ : जिल्ह्यात पावसाचे कमबॅक झाल्याने युरियाच्या मागणीत वाढ झाली आहे. असे असतानाच खरिपाच्या सुरुवातीलाच यंदा युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 20 हजार मेट्रिक टन युरियाची तूट आहे. मागणीच्या तुलनेत युरियाचा पुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

जिल्ह्यात यंदा नऊ लाख हेक्‍टरवर खरीप हंगामाची पेरणी होणार आहे. त्यासाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशक आदींचे नियोजन कृषी विभागाने केले होते. असे असले तरी सुरुवातीला सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोयाबीनचा निर्माण झालेला तुटवडा कृत्रिम असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांनी मिळेल त्या कंपनीच्या बियाण्यांची लागवड केली. मात्र, सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. आतापर्यंत चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकूण परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता युरियाची अडचण कमालीची भेडसावत आहे. 

सध्या जिल्ह्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्याला 17 हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. गतवर्षी आजच्या स्थितीत 36 हजारांहून अधिक मेट्रिक टन युरिया जिल्ह्याला प्राप्त झाला होता. गतवर्षी युरियाची कमतरता शेवटी दिसूनच आली होती. यंदा आताच जवळपास 20 हजार मेट्रिक टन युरिया कमी आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी वाढणार आहे. अशा परिस्थितीत कृषी विभाग, आरसीएफ कशा पद्धतीने नियोजन करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

पिंपळखुटीत बाराशे मेट्रिक टन युरिया दाखल 

जिल्ह्यात युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशा परिस्थितीत पिंपळखुटी येथील रॅक पॉइंटवर बाराशे मेट्रिक टन युरिया दाखल झाला आहे. यातून मोठी तूट भरून निघणार नाही. परंतु, थोड्या फार प्रमाणात तरी शेतकऱ्यांना युरिया मिळणार आहे. येत्या काही दिवसांत आखणी युरिया येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. 

सध्या शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत आवश्‍यकता आहे. या काळात शेतकऱ्यांना खत मिळत नाही. काही ठिकाणी जादा दरात विक्री सुरू आहे. कृषी विभागाने यावर लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे. 
-राम मडावी, शेतकरी, जांब, 

सध्या शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत आवश्‍यकता आहे. मात्र, आवक कमी असून मागणी जास्त आहे. खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना गरज असल्याने जादा दरात विक्री सुरू आहे. प्रशासनाने युरियाची तपासणी करावी. 
-रमेश राऊत, शेतकरी, घाटंजी. 

संपादन - राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT