वैशाली डाखोरे
वैशाली डाखोरे  
विदर्भ

गरिबीवर मात करीत वैशाली डाखोरेची झेप

सकाळवृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : इच्छाशक्ती आणि प्रयत्न असेल, तर गरिबी ध्येयाच्या आड येऊ शकत नाही. तालुक्‍यातील उडदी येथील वैशाली नारायण डाखोरे या विवाहित महिलेने गरिबीला छेद देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झेप घेतली. तिने कर सहायक व मंत्रालय लिपिक या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. तिच्या या यशाचे कौतुक होत आहे.
वैशालीचे प्राथमिक शिक्षण महागाव तालुक्‍यातील हिवरा खुर्द येथे झाले. तिचे लग्न पुसद आगारातील वाहक नारायण डाखोरे यांच्याशी 2014 मध्ये झाले. याचवेळी तिने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिने स्पर्धा परीक्षेसाठी उडदी येथेच तयारी चालवली. घरसंसार सांभाळून नियमितपणे अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कर सहायक व मंत्रालय लिपिक या दोन्ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील, सासू-सासरे, पती आणि शिक्षकमित्राला दिले.

यशाच्या आड गरिबी येऊ शकत नाही. अभ्यास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यातून यशोशिखर गाठता येते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी माझे पती नारायण यांनी मला प्रोत्साहन दिले.
-वैशाली नारायण डाखोरे,
उडदी, ता. पुसद.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT